‘वादग्रस्त वक्तव्य करणार्या कोश्यारींना राज्यपाल पदावरून मुक्त करा’ – आपची मागणी
पुणे, २० नोव्हेंबर २०२२:
महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आराध्य दैवत मानतो आणि त्यांना राष्ट्रपुरुष म्हणून हृदयात स्थान देतो. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे विधान हे अनावश्यक आणि मराठी माणसाच्या भावनांचा अनादर करणारे आहे. त्यांना राज्यपाल पदावरून मुक्त करा अशी मागणी आम आदमी पक्षान केली आहे.
शिवाजी महाराज जुन्या काळातले विषय आहेत. तुमचे हिरो तुम्हाला इथेच मिळतील. त्यासाठी बाहेर जायची गरज नाही. डॉ. आंबेडकर, डॉ. गडकरी हेच सध्याचे आदर्श आहेत, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.
त्याचबरोबर आधुनिक हिरो म्हणताना बाबासाहेब आंबेडकर आणि नितीन गडकरी हे कुठल्याही पद्धतीने एका श्रेणीमध्ये बसवणे गैरच. भाजपच्या नितीन गडकरींचा सन्मान करण्याच्या नादात बाबासाहेब आंबेडकरांचा संदर्भ देणे हे सुद्धा अयोग्यच आहे. आम आदमी पार्टी या सर्वांचं निषेध करते आणि राज्यपाल कोशारी यांनी यापूर्वीसुद्धा अशीच वादग्रस्त व असंवेदनशील विधाने केली असल्याने त्यांचा राजीनामा घ्यावा अशी आम आदमी पार्टीचे मागणी आहे.
भाजपचे प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी हे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांविषयी चुकीची विधाने करीत आहेत. इतिहासाची तोडमोड करीत द्वेषाचे राजकारण करणे ह्या भाजप नीतीचा आम आदमी पार्टी निषेध करते.