शितल म्हात्रे किरीट सोमय्या यांच्या व्हिडिओचा संदर्भ देत सुषमा अंधेरी यांनी केली मुख्यमंत्र्यांवर टीका

पुणे, १४ सप्टेंबर २०२३ : मराठा आरक्षणाचा संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेची जोड उठली आहे. मुख्यमंत्र्यांनी यामध्ये स्पष्टीकरण दिल्यानंतरही ठाकरे गटाच्या उपनेते सुषमा अंधारे यांनी शिंदे यांच्यावर टीका करत शितल मात्रे यांचा खरा व्हिडिओ समोर आला नाही तसं आता मुख्यमंत्र्यांचाही व्हिडिओ समोर येणार का असा प्रश्न केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची संयुक्त पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी या तिघांमधील चर्चा न्यूज चॅनलच्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाली. त्यामध्ये मुख्यमंत्री “आपल्याला काय आपण येऊन बोलून जायचे” असे वक्तव्य केले आहे. या वाक्यामुळे मराठा समाजाकडून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच हे सरकार आरक्षणाबद्दल गंभीर नसल्याचाही आरोप केला जात आहे. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी हा व्हिडिओ माॅर्फ केल्याचा दावा केला आहे. त्यावरून आता सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांना टार्गेट केले आहे.

अंधारे यांनी मुंबईतील रोड शो मध्ये शितल म्हात्रे यांनी ठाकरे गटाचे आमदार यांच्या किसिंग सीन चा संदर्भ देत फेसबुकवर पोस्ट टाकली आहे. “शितल म्हात्रे प्रकरणांमध्ये रॅलीतील व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने मोर्फ करून फिरवला असे सांगत ते प्रकरण दडपून टाकले. तेव्हाही अनेकांनी मग ओरिजनल व्हिडिओ कुठे आहे म्हणून मागणी केली होती, जो आजतागायत म्हात्रे सादर करू शकल्या नाहीत.
किरीट सोमय्या चा व्हिडिओ खराच होता हे दस्तूर खुद्द मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले.
आता मराठा आरक्षणासंदर्भातील कालपासून वायरल झालेला व्हिडिओ हा एडिटेड आहे असं सन्माननीय मुख्यमंत्री महोदय सांगत आहेत. जर हा व्हिडिओ एडिटेड असेल तर मग देवेंद्र फडणवीस, अजित दादा आणि दस्तूर खुद्द मुख्यमंत्री यांचा नेमका संवाद काय झाला आणि त्याचा खरा व्हिडिओ कसा आहे तो एकदा मुख्यमंत्री महोदयांनी प्रकाशित करायला हवा”, अशी मागणी अंधारे यांनी केली आहे.