रामदास आठवले लोकसभेच्या रिंगणात ?
अहमदनगर, १२ मार्च २०२३: शिर्डी लोकसभा मतदारसंघात २००९ मध्ये रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे पराभूत झाले होते. मात्र आता पुन्हा एकदा आठलेंना शिर्डी लोकसभा लढण्याचे वेध लागले. त्यांनी पुन्हा उभं एकदा खासदारकीसाठी उभं राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आज शिर्डीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी बोलतांना आठवले म्हणाले की, काही वर्षापूर्वी मी शिर्डी लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, शिर्डीच्या मतदारांनी माझा पराभव केला होता. मात्र मला पुन्हा एकदा शिर्डी लोकसभा लढवण्याची इच्छा आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी विश्वास दाखवला तर मी शिर्डी लोकसभा लढणार असून शिर्डीच्या विकासासाठी नक्कीच प्रयत्न करणार.
सध्या केंद्रात भाजप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची युती आहे. तर राज्यात भाजप आणि शिंदे गट यांची युती असून खासदार लोखंडे हे युतीकडून विद्यमान खासदार आहेत. आठवलेंच्या या विधानाने आगामी लोकसभा निवडणुकीत तिकीट वाटपावरून पक्षश्रेष्ठींपुढे मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. आगामी काळात काय होतं हे पाहणं औत्सुक्याचं असलं तरी विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचे टेन्शन वाढणार असल्याची जिल्ह्याच्या राजकारणात चर्चा आहे.
आठवले म्हणाले की, शिर्डीत लवकरच रिपब्लिकन पक्षाचे भव्य अधिवेशन होणार असून मुख्यमंत्र्यासह अनेक बडे नेते हे या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहे. नागालॅंड सारख्या प्रदेशात रिपाईचे आमदार निवडून आलेत. मग महाराष्ट्रात रिपाईचे आमदार का निवडून येवू शकत नाही? यावर या अधिवेशनात विचारमंथन होणार आहे. ते म्हणाले, मला एकट्याला मंत्री करून मी समाधानी नाही. पक्षातील इतर कार्यकर्त्यांनाही संधी मिळावी. 2 ते 3 महामंडळे मिळावी, असा प्रस्ताव सरकार पुढे ठेवल्याच आठवले म्हणाले. यासह इतर ठिकाणी आमच्या पक्षातील लोकांना संधी मिळावी. मंत्रीमंडळ विस्तार लवकर व्हावा. आरपीआयला एक मंत्रीपद दिलं जावं. राज्यपाल नियूक्त आमदारात आरपीआयला एक जागा मिळावी, असंही ते म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्रात एकट्याच्या बळावर निवडून येणे अशक्य आहे. त्यामुळे मित्र पक्षाने आम्हाला सहकार्य करावं. येत्या लोकसभा निवडणुकीत तीन जागा आणि विधानसभेत 15 जागा आम्हाला मिळाव्यात. या विषयी आमची भाजपच्या वरिष्ठांशी चर्चा सुरू असल्याचं त्यांनी सांगिलतं. कारण, समाजातील लोकांना संधी देण्याचा माणस आहे. ज्या जागा निवडणऊ येतील तितं काम करण्याचा प्रतत्न असेल. देशपातळीवर पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. केवळ फोटो काढण्यासाठी गर्दी नकोय, तर कार्यकर्त्यांना कामाला लागाव, असं आवाहन त्यांनी केलं.
यावेळी त्यांनी राज ठाकरेंविषयी देखील भाष्य केलं. राज ठाकरे यांची आम्हाला आवश्यकता नाही. आम्ही तिघे एकत्र असल्यावर राज ठाकरेंची गरज नाही. मुंबईत सत्ता मिळेल एवढी राज ठाकरेंची ताकद नाही, त्यांच्या सभेला गर्दी होते पण मतदान होत नाही. राज ठाकरेंनी भाजपला युतीसाठी प्रस्ताव दिला तरी दिल्लीहून या युतीला मान्यता मिळणार नाही, असं आठवले म्हणाले. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सीएम एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे प्रमुख राज ठाकरे हे अनेकदा एकत्र कार्यक्रमांत दिसले. अशाचत आठवलेंनी राज ठाकरेंची गरज नसल्याचं वक्तव्य केल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.
आमची युती नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली 2024 च्या लोकसभा निवडणुका जिंकणार आहोत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने काही फरक फडणार नाही, असंही आठवलेंनी म्हटलं आहे. एवढचं नाही तर मी शिर्डीत हरलो आहे. पण शिर्डीच विकास करण्यासाठी मी पन्हा उभा राहिन. शिर्डीची जनता माझ्यावर पूर्ण विश्वास आहे, असंही आठवलेंनी सांगतिल.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप