राहूल गांधी अपरिपक्व नेते – केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची टीका
पुणे, ९ नोव्हेंबर २०२४: देशाच्या स्वातंत्र्यानंतर ‘संविधान दिवस ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने देशात प्रथम सुरू केला. ७५ वर्ष मुस्लिम समजास देखील काँग्रेसने व्होट बँक म्हणून राजकारणात वापर केला. काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी नेहमी जात व धर्म बाबत राजकारण केले आहे. मध्ये जाऊन देशाला शिव्या देऊन नेता होऊ शकत नाही. राहुल गांधी अपरिपक्व नेते आहेत, अशी टीका केंद्रीय संसदीय मंत्री किरेन रिजिजू यांनी केली.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत किरेन रिजिजू बोलत होते. भाजप पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर, पुष्कर तुळजापूरकर, हेमंत लेले, निवेदिता एकबोटे , अतुल सावे, मिलिंद कांबळे उपस्थित होते.
डॉ. रिजिजू म्हणाले, देशाची आर्थिक राजधानी मुंबई असून देशात उद्योग निर्मिती केंद्र महाराष्ट्र आहे. लोकसभा निवडणुकी नंतर विधानसभा निवडणुक पर्यंत अनेक गोष्टी बदललेल्या आहे. काँग्रेसला लोकसभा मध्ये जनतेची दिशाभुल करून काही मते मिळाली होती पण आता त्यांचा पर्दाफाश झाला आहे. त्यामुळे त्यांना आता जनता समर्थन मिळणार नाही. महायुतीला राज्यात बहुमत मिळेल असे सध्या दिसून येत आहे. मुंबई मध्ये मी अनेक वर्ष आलो आहे आज मुंबई जागतिक शहर बनले आहे. अनेक पुल, उड्डाणपूल, बोगदे, रस्ते यामुळे मुंबईचा चेहरा मोहरा बदलला आहे. समृध्दी महामार्गमुळे नागपूर देखील जवळ आले आहे. लाडकी बहिण योजना मुळे महिलांना आर्थिक आधार मिळाला असून त्या खुश आहे. गरिबांना देखील न्याय देण्याचे काम जनतेने केले आहे. काँग्रेसचा गट यामुळे अस्वस्थ होऊन त्यांनी काही घोषणा सुरू केल्या पण त्यावर आता मतदार यांचा विश्वास नाही. गरीबी हटाओ नारा काँग्रेसने दिला पण त्याची पूर्तता मोदी सरकारने केली.
सिमवर्ती भागात मी राहतो चीन सोबत जाणारे रस्ते अस्तित्वात नव्हते पण मोदी यांनी पक्के रस्ते सर्व ठिकाणी तयार करून पायाभूत सुविधा निर्माण केल्या. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नागपूर मध्ये बनावट पुस्तक हातात धरून संविधान नारा दिला पण आम्ही त्यांचा बनाव उघड केला. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विविध गोष्टीतून त्रास देण्याचे काम सातत्याने काँग्रेसने केले आहे. त्यांना भारतरत्न देखील त्यांनी जाणीवपूर्वक दिले नाही. संविधानाचा मुळ आत्मा बदलण्याचे काम काँग्रेसने केले त्याचे उत्तर त्यांनी द्यावे.मणिपूर बाबत काँग्रेसने आतंकवाद अड्डा बनवला असल्याचे दाखवले पण त्याठिकाणी झालेला दोन समाजातील वाद हा गैरसमजुती मधून घडलेला आहे. देशाचा तो भाग असून त्याठिकाणी शांतता प्रस्थापित होत आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
देशाच्या जमिनीवर कोण अतिक्रमण करू शकत नाही
जम्मू काश्मीर मध्ये कलम ३७० मुळे संविधान त्याठिकाणी लागू होत नव्हते किंवा आरक्षण दिले जात नव्हते. पण ते कलम काढल्यामुळे आता मागास वर्गीय नागरिकांना आरक्षण लाभ मिळत आहे. आता काँग्रेस तेथील नागरिकांचे आरक्षण बंद करण्यासाठी धडपड करत आहे.कलम ३७० आम्ही त्याठिकाणी पुन्हा लागू करून देणार नाही. दिवाळीत भारतीय लष्कराने सीमावर्ती भागात चीन लष्करास मिठाई दिली , ते मिठाई जास्त खात नसताना देखील त्यांनी ती खाल्ली. मोदी यांच्या काळात आपल्या देशाच्या जमिनीवर कोण अतिक्रमण करू शकत नाही किंवा हिस्कावून घेऊ शकत नाही असे रिजिजू यांनी सांगितले. जगातील सर्वाधिक वक्फ बोर्ड जमीन भारतात आहे त्या गरीब मुसलमान यांना मिळाल्या पाहिजे असे आमचे मत आहे.