सार्वजनिक स्वच्छतागृहांचा दर्जा सुधारावा, विशेष निधीच्या तरतुदीची गरज: आमदार सिद्धार्थ शिरोळे

मुंबई, 15 मार्च 2023 – नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांचा दर्जा सुधारावा याकरिता भरीव निधीची तरतूद करावी, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेत बोलताना आज (बुधवारी) केली.

शिवाजीनगर मतदारसंघामध्ये अनेक सेवा वस्त्या आहेत. या वस्त्यांमध्ये मी सार्वजनिक स्वच्छतागृह पाहणी अभियान सुरू केले. आत्तापर्यंत जवळपास १०० सार्वजनिक शौचालयांची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान मला शौचालयांची दुरावस्था निदर्शनास आली.

यामध्ये प्रामुख्याने पाण्याची कमतरता असणे व ड्रेनेज वारंवार तुंबत असणे या समस्या बहुतेक सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या ठिकाणी असतात आणि यामुळेच नागरिक सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर कमी प्रमाणात करतात.

या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक सेवा वस्त्यांमध्ये पाणी व ड्रेनेज साठी योग्य निधी खर्च करावा तसेच पुरेसे पाणी उपलब्ध करण्याची व्यवस्था उभी केली तर नागरिकांचे आरोग्य चांगले राहील. तरी सार्वजनिक स्वच्छतागृहांचा दर्जा उंचावण्यासाठी त्यांना भरीव निधीची तरतूद करावी, असे आमदार शिरोळे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

खडकी – बोपोडी येथील पोलीस चौक्या सुरु कराव्यात…!!

शिवाजीनगर मतदारसंघातील “बोपोडी – खडकी या भागांमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चाललेले आहे. गुन्हेगारीमध्ये अल्पवयीन मुले नशापान, चोऱ्या, छेडछाड, मारामारी, इ. गुन्हे वारंवार करीत आहेत. तसेच छोट्या व्यापाऱ्यांना धमकावणे व हफ्ते मागणे असे प्रकार वाढत चाललेले आहेत.

बोपोडी परिसरातील जुन्या जकात नाक्यावर पोलीस चौकी असून ती बंद आहे. तसेच खडकी बाजार पोलीस चौकी सुद्धा बंद आहे. यामुळे खडकी – बोपोडी येथील नागरिकांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

तरी बोपोडी – खडकी भागात पोलीस चौक्यांमध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी नियुक्त करून दोन्ही पोलीस चौक्या सुरु कराव्यात, अशीही जोरदार मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली.

कळावे.

आपला,

सिद्धार्थ शिरोळे,
आमदार.