पुणे: कसबा जिंकण्यासाठीची धडपड; फडणवीसांनी घेतली व्यापारी, गणपती मंडळांच्या पदाधिकार्यांची बैठक
पुणे, १६ फेब्रुवारी २०२३: कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत पराभूत होणार असल्याचे सर्वे पुढे आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचंड ऍक्टिव्ह झाले आहेत. त्यांनी बुधवारी पुणे दौरा करत यामध्ये केवळ व्यापारी, गणेश मंडळाच्या प्रतिनिधी यांच्याशी चर्चा केली. जाहीर कार्यक्रम न घेता बैठकांच्या माध्यमातून मतांची बेरीज करण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी सुरू केला आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघाचा प्रचार शकेला पोहोचला आहे राजकीय घडामोडींना वेगळ आहे. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचे आव्हान भाजपला जड जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भाजपने एक गठ्ठा मते भाजपकडे कसे होतील याचे प्रयत्न सुरू केले आहेत. क्रीडामंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण पुण्यामध्ये तळ ठोकून आहेत. त्यातच महत्त्वाच्या बैठका घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यात आले होते. डेक्कन येथील सावरकर भवन येथे फडणवीस आणि एक बैठक घेतली.
त्यानंतर रात्री आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या निवासस्थानी शहरातील व्यापारी, उद्योगपती, कसब्यातील प्रमुख गणपती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. कसबा विधानसभा मतदारसंघात लक्ष्मी रस्ता, रविवार पेठ, गुरूवार पेठ, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता यासह इतर शहरातील प्रमुख बाजारपेठ आहे. व्यापारी, ग्राहक यांच्या समस्या आहेत. त्यावर चर्चा करून, सुधारणा करणे, तसेच राज्य व केंद्र सरकाच्या पातळीवरील
समस्या सोडविण्याच्यादृष्टीने व्यापारी, उद्योगपतींनी त्यांची भुमिका मांडली.
यामध्ये पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका व सचीव महेन्द्र पितळीया यांनी पगार वरील प्रोफेशनल टॅक्स रद्द करावा. सध्या महाराष्ट्र मध्ये दरमहा ७५०० च्या पगारावर प्रोफेशनल टॅक्स घेतला जातो. शहरातील होलसेल व सेमीहोलसेल मार्केट साठी सोयीस्कर जागा उपलब्ध करून द्यावी.
शहरातील ४७८ झोपडपट्टीचे पुनर्वसन संधर्भात महासंघाने दिलेल्या प्रस्तावाचा विचार करावा या मागण्या केल्याा. क्रीडामंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह शहर भाजप मधील प्रतिनिधी या वेळेस उपस्थित होते.