पुणे: काँग्रेसला दिलासा, भाजपला धक्का बाळासाहेब दाभेकरांची बंडखोरी शमली
पुणे, ९ फेब्रुवारी २०२३ : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब दाभेकर यांनी उमेदवारी अर्ज भरून बंडखोरी केलेली होती. त्यांची बंडखोरी समविण्यास काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यामुळे त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, ही बंडखोरी संपल्याने भाजपला मात्र जोरदार धक्का बसला आहे.
बाळासाहेब दाभेकर उमेदवारी यांनी अर्ज मागे घ्याव्या यासाठी अनेक नाट्यपूर्ण घडामोडी बुधवारी घडल्या. बाळासाहेब दाभेकर यांनी अर्ज मागे घ्यावा यासाठी अनेक काँग्रेस नेते विनंती करीत होते. सकाळी ११ वाजता शिवसेनेचे (ठाकरे गट) विशाल धनवडे, राष्ट्रवादीचे अंकुश काकडे, काँग्रेसचे श्रीकांत शिरोळे यांनी दाभेकरांची भेट घेऊन त्यांना अर्ज मागे घेण्याची विनंती केली. पण ते आपल्या उमेदवारीवर ठाम होते. दुपारी ४ वाजता या मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे प्रभारी आमदार संग्राम थोपटे, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, अभय छाजेड, कमल व्यवहारे, अजित दरेकर यांनी बाळासाहेब यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेतली. त्यावेळी राष्ट्रवादीचे श्री अंकुश काकडे यांना देखील तेथे बोलून घेण्यात आले. बाळासाहेबांना सर्वांनी विनंती केली की आपण माघार घ्यावी, पक्ष आपल्यावरील अन्याय निश्चित दूर करेल, परंतु बाळासाहेबांनी माझ्या कार्यकर्त्यांशी बोलल्याशिवाय मी निर्णय घेऊ शकत नाही असे सांगितले. काल रात्री ११ वाजता आमदार संग्राम थोपटे, अंकुश काकडे यांनी बाळासाहेबांच्या कार्यालयात त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. तेथूनच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली, आणि त्यानंतर नाना पटोले यांच्या विनंतीला मान देऊन बाळासाहेबांनी अर्ज मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला.
मिसाळ बिडकर दाभेकरांच्या कार्यालयात
रात्री अकरा वाजता बाळासाहेब दाबेेकरांच्या कार्यात बैठक सुरू असताना भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ माजी सभागृहातील गणेश बिडकर तेथे पोहोचले. ते दोघे नेमके कोणत्या निमित्ताने आले होते हे स्पष्ट होऊ शकले नसले तरी यावेळी बाळासाहेब दाभेकरांनी “मी काँग्रेसचा आहे. मी काँग्रेस पासून दूर जाऊ शकत नाही” असे स्पष्टपणे सांगितले. यानंतर मात्र या सर्व पक्ष नेत्यांमध्ये हास्य विनोद सुरू झाले.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप