पुणे: आमदार अश्विनी ताई जगताप ह्यांचा पूनावळेमध्ये कचरा डेपो होऊ देणारच नाही हा पूनावळेकर नागरिकांना शब्द
पुणे, ०५/११/२०२३: पूनावळे कचरा डेपो हटाव कृती समिती आणि पूनावळे ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तावित पूनावळे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी रविवार, दिनांक ५ नोव्हेम्बर रोजी सकाळी १०-१२ वा. बाइक रैली चे आयोजन केली होती . सदर रॅली ला अतिशय उस्फुर्त प्रतिसाद पूनावळेकर ग्रामस्थ आणि नागरिकांनी दिला. हजारोंच्या संख्येने सर्वांनी ह्या कचरा डेपो रद्द करण्याची मागणी PCMC चे विद्यमान आमदार आमदार अश्विनी ताई जगताप ह्यांना करण्यात आली.
ह्यावेळी ताईंनी सर्व नागरिकांना शब्द दिला की मी कोणत्याही परिस्थतीमध्ये येथे कचरा डेपो होऊ देणार नाही. त्या प्रसंगी लवकरात लवकर एक पूनावळे येथील शिष्टमंडळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वनमंत्री ह्यांची भेट घालून त्यावर त्वरित निर्णय घेऊ असे आश्वासन दिले आहे . त्याच बरोबर ह्या पूर्ण आंदोलनाला त्यांनी पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे . वेळ पडली तर त्या सुद्धा ह्या आंदोलनात सहभागी होतील ही ग्वाही दिली आहे.
ह्या रॅली मध्ये आणि चिपको आंदोलनात पूनावळे, ताथवडे, मारुंजी, जांबे, हिंजवडी, लाइफ रिपब्लिक टाउनशिप, वाकड या परिसरातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
सध्या पूनावळे परिसरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालेले असुन ते अजूनही सुरूच आहे. सुमारे १ लाखाहुन अधिक नागरिक सध्या पूनावळे येथे राहत आहेत.
येथील नैसर्गिक वातावरण, शेजारी असलेले हिंजवडी आय टी पार्क यामुळे नागरिक या ठिकाणी राहण्यासाठी प्राधान्य देत आहेत, परंतु तेच आता घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामुळे खराब होण्याची वेळ येताना दिसत आहे. सदर प्रस्तावित प्रकल्पापासून विविध इमारती, गृहनिर्माण सोसाइटी, खुप कमी अंतरावर (२०० – ४०० मीटर) आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा अतिशय गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो.
प्रस्तावित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हा जंगलाच्या अगदी कडेला लागून उभारण्याचा विचार करण्यात आलेला आहे ज्यामुळे प्रचंड नैसर्गिक हानी होईल आणि नैसर्गिकरित्या लाभलेलं निसर्गसौंदर्य नष्ट होईल. तसेच पुनावळे येथील बंधाऱ्या मधून संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरास पाणीपुरवठा केला जातो. या प्रकल्पामुळे शहरातील सर्व नागरिकांना दुषित पाणी पुरवठा होण्याची दाट शक्यता आहे.
प्रस्तावित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हा पश्चिम दिशेला आहे. सामान्यतः वर्षभर वारे हे नेहमी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात आणि म्हणून याचा परिणाम पुनावळेसोबतच जवळच असलेल्या वाकड, ताथवडे, हिंजवडी आय टी पार्क, मारुंजी, मुंबई पुणे महामार्गासारख्या आधीच विकसित असलेल्या परिसरात देखील होण्याची दाट शक्यता आहे.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप