पुणे: कसब्यासाठी काँग्रेसकडे मास्टर प्लॅन, फेब्रुवारीत उमेदवार जाहीर होणार – नाना पटोले
पुणे, २४ जानेवारी २०२३ : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी काँग्रेस पक्षात उमेदवारीसाठी रीघ लागली असून आठ ते दहा जणांनी ,माझ्याकडे अर्ज केले आहेत. तीन किंवा चार फेब्रुवारीपर्यंत आमचा उमेदवार जाहीर करू. यासमतदारसंघात १९८० पर्यंत काँग्रेसचे
प्राबल्य होते. त्यामुळे हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडे आणण्यासाठी आमचा मास्टर प्लॅन तयार आहे, असे सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व आमदार नाना पटोले यांनी निवडणूक लढविण्याचे संकेत दिले.
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सूचनेनुसार सोमवारपासून देशभरात हात से हात जोडो’ कार्यक्रम पक्षाकडून हाती घेण्यात आला आहे. राज्यातील या कार्यक्रमाची सुरुवात सोमवारी समता भूमीपासून करण्यात आली. या कार्यक्रमासाठी पुण्यात आले असताना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पटोले म्हणाले, “एखाद्या लोकप्रतिनिधीचा मृत्यू
झाल्यास तेथील पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची महाराष्ट्राची पंरपरा असून, काँग्रेसने ती कायम निभावली आहे. गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाल्यावर त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिल्यावर,
तेथील निवडणूक बिनविरोध केली होती. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या काळात पंढरपूर,
देगलूर, कोल्हापूर यासह अनेक ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीत. संबंधित कुटुंबातीलच व्यक्तीला
भाजपने विरोध करण्याचे काम केले आहे.”
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या पत्राबद्दल विचारले असता पटोले म्हणाले, “महाविकास
आघाडी सरकारच्या काळात संविधानिक व्यवस्थेला छेद देण्याचे काम राज्यपालांनी केले. राज्यपाल
भवन हे भाजप भवन झाले होते. भाजपला अधिकाधिक फायदा कसा होईल, असे काम कोश्यारी यांनी केली. तसेच, महात्मा फुले आणि
सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल त्यांनी केलेल्या विधानातून त्यांच्या मनात किती पाप आहे, हे दिसत
येते. राज्यपाल कोश्यारी सतत वादग्रस्त विधाने करीत राहिल्याने कोश्यारी यांना स्व-इच्छेने पदमुक्त
न करता, त्यांची हकालपट्टी करावी.”
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी युतीची घोषणा केली. या युतीबाबत पटोले
म्हणाले, “ठाकरे आणिआंबेडकर यांच्या युतीला
आमच्या शुभेच्छा आहेत. ठाकरे यांच्यासोबत माझे
सकाळी बोलणे झाले असून, आमची भूमिका
मांडली आहे. आंबेडकर यांचा प्रस्ताव आल्यानंतर,
आमचा प्रस्ताव देणार आहोत. त्यांच्याकडून
कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव आम्हाला आलेला
नाही.’
अखिल भारतीय काँग्रेसने हाती घेतलेल्या ‘हातसे हात जोडो’ या राज्यातील अभियानाची सुरुवात
सोमवारी महात्मा फुले वाड्यातील महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी कलम व्यवहारे, अरविंद शिंद, रमेश बागवे, सुशीलकुमार शिंदे, नाना पटोले, दिप्ती चवधरी, उल्हास पवार, अभय छाजेड आदी उपस्थित होते.