पुणे, २१/०६/२०२३: ८००० साधकांनी केले योगाभ्यास
पुणे, 21 जून 2023: आंतराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी पुणे शहर ,आर्ट ऑफ लिविंग तसेच महा एन जी ओ फेडरेशन च्या वतीने स प महाविद्यालयाच्या मैदानावर ८००० साधकांची योग प्रात्यक्षिके सादर करण्यात आली यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जगदिश मुळीक , आर्ट ऑफ लिविंग चे अपेक्स सदस्य राजेय शिरस्ते महा एन जी ओ फेडरेशनचे शेखर मुंदडा आंतराष्ट्रीय गायक नितीन डावर आदी उपस्थित होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ विधिज्ञ एस के जैन उपस्थित होते
या वेळी बोलताना शहराध्यक्ष जगदिश मुळीक म्हणाले की आंतराष्ट्रीय योग दिन जेव्हा पासून साजरा व्हायला लागला तेव्हा पासून लोकांच्या मध्ये एक उत्साह ऊर्जा जागृत झाली लोक आरोग्य विषयी खूप सजग झाले आहेत निरोगी जीवनसाथी योग अत्यंत महत्वाचे आहेत
या वेळी एस के जैन यांनी या उपक्रमाचे कौतुक केले या कार्यक्रमाचे आयोजन सरचिटणीस गणेश घोष ,संदीप लोणकर राजेश येनपुरे प्रशांत हरसूल धनंजय जाधव निहाल घोडके पुष्कर तुळजापूरकर आदींनी केले
यावेळी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने माजी नगरसेवक योगेश मुळीक, अजय खेडेकर प्रमोद कोंढरे आदी उपस्थित होते यावेळी सुमारे ८००० साधकांनी योग प्रात्यक्षिके सादर केली