पोलिस आयुक्तांनी गुन्हेगारांची काढली परेड, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

पुणे, ७ फेब्रुवारी २०२४: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा मुख्यमंत्री शिंदेंवर पुण्यातील गुंडाने शिवसेनेत प्रवेश केल्यावरून टीका केली आहे. राऊत म्हणाले की, ‘पुण्याचे नवे पोलीस आयुक्त महोदयांनी काल म्हणे गुंडांची परेड घेऊन इशारा दिला. पण मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत थेट मींधे गँग मध्ये प्रवेश करीत आहेत. त्यांची परेड काढणार काय?’ असा सवाल राऊतांनी करत शिंदेंवर हल्लाबोल केला.

संजय राऊत या ट्विटमध्ये म्हटले आहेत की, पुण्याचे नवे पोलीस आयुक्त महोदयांनी काल म्हणे गुंडांची परेड घेऊन इशारा दिला. राजकारण्यांच्या आसपास फिरकायचे नाही वैगरे..छान! काही गुंड टोळ्या आणि त्यांचे प्रमुख मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत थेट मींधे गँग मध्ये प्रवेश करीत आहेत. त्यांची परेड काढणार काय? हातात भगवा घेतलेले हे महात्मा कोण आहेत? हा पुण्यातला गुन्हेगार आहे. याच्यावर खुन ,खुनाचा प्रयत्न, चोरी, अपहरण असे गुन्हे आहेत व मोका मधुन नुकताच बाहेर आला आहे. महाराष्ट्रात गुंडांनी गुंडासाठी चालविलेले राज्य!
दरम्यान सध्या संजय राऊत यांनी सरकारमधील नेत्यांचे आणि विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचे पुण्यातील गुंडांसोबतचे फोटो ट्विट करण्याचं सत्र सुरू केले. त्यामध्ये आज पुन्हा एकदा राऊत यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केलेल्या पुण्यातील गुंडासोबतचा मुख्यमंत्री शिंदे यांचा फोटो ट्विट केला आहे. ज्यामध्ये शिंदे यांच्यासोबत एक व्यक्ती हाती भगवा झेंडा घेत पक्षप्रवेश करताना दिसत आहे.

त्यामुळे संजय राऊतांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, जर ‘पुण्याचे नवे पोलीस आयुक्त महोदय हे गुंडांची परेड घेऊन इशारा देत असतील तर पण मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत थेट मींधे गँग मध्ये प्रवेश करीत आहेत. त्यांची परेड काढणार काय?’ असा सवाल त्यांनी केला आहे. तर काल (6 जानेवारी) ला राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कुख्यात टोळी प्रमुख निलेश घायवळ सोबतचा फोटो ट्विट केला होता. यातून त्यांनी पुण्यातल्या गुन्हेगारांना राजकीय वरदहस्त शिंदे पिता-पुत्राकडून मिळतो का?, असा सवाल करत घणाघात केला होता.

याच दरम्यान काल (6 जानेवारी) ला पुण्याचे नवीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारताच पहिला दणका पुण्यातील नामचीन गुंडांना आणि त्यांच्या टोळीप्रमुखांना दिला. यामध्ये त्यांनी गुंड गजानन मारणे, निलेश घायवळ, बाबा बोडके याच्यासह पुण्यातील इतर गुंडांच्या टोळीतील प्रमुख म्होरक्यांसह इतर २०० ते ३०० गुंडांची परेड घेतली.

आगामी निवडणुकांच्या दिवसांमध्ये कोणत्याही राजकीय नेत्याला भेटायचे नाही, राजकीय नेत्यांसोबतच्या जुन्या भेटींचे फोटो व्हायरल करायचे नाहीत, रिल्स करायचे नाहीत. दहशत निर्माण होईल अशा आशयाचे स्टेटस टाकायचे नाहीत. गुन्ह्याचे, गुन्हेगारांचे उदात्तीकरण करायचे नाही. निवडणुकीच्या दिवसांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करायचे नाही, असा दमच आयुक्तांनी यावेळी भरला.