पिंपरी चिंचवड: मोशी येथे ‘कन्स्ट्रो २०२३ इंटरनॅशनल एक्सपो’

पिंपरी, दि. ११ जानेवारी २०२३: पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग रिसर्च फाउंडेशन (पीसीइ आरएफ), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि पिंपरी चिंचवड महापालिका यांच्यातर्फे ‘कन्स्ट्रो २०२३ इंटरनॅशनल एक्सपो’ प्रदर्शन १२ ते १५ जानेवारी या कालावधीत आयोजित केली जाते. हे प्रदर्शन मोशी येथील अद्ययावत पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन या येथे होणार आहे.

या प्रदर्शनात निर्माण क्षेत्रातील अत्याधुनिक वस्तू , उपकरणे, प्रणाली, व तंत्रज्ञान यांची माहिती मिळणार आहे. त्यामुळे निर्माण क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी ही मोठी पर्वणी आहे. या प्रदर्शनास राज्यातील निर्माण क्षेत्रात कार्यरत असणारे विविध व्यावसायिक भेट देणार आहेत. वास्तू रचना व स्थापत्य शास्त्रचे विद्यार्थीही याठिकाणी भेट देणार आहेत. या प्रदर्शनाच्या निमित्ताने निर्माण क्षेत्राशी निगडित विविध विषयांवर सर्व दिवस चर्चा सत्र आयोजित केलेली आहे. ज्या मध्ये विविध विषयातील तज्ञ विचार मांडणार आहेत. प्रदर्शनात तंत्रज्ञानाचे तसेच सुरक्षे विषयक प्रात्यक्षिक देण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन १२ जानेवारी दुपारी ३.०० वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. या प्रसंगी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष निमेश पटेल व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे आयुक्त राहुल महिवाल तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
जास्तीत जास्त वास्तुविशारद, विकसक, बिल्डर्स, कंत्राटदार, इंटेरिअर डिझायनर, अभियंते, उत्पादक व पुरवठादार यांनी या प्रदर्शनाला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.