पंकजांचं धनंजय मुंडेंना मोठं गिफ्ट, भाऊ बहिणीची जवळीक वाढली
बीड, १५ एप्रिल २०२३ ः मागील काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे व त्यांचे प्रतिस्पर्धी असणारे त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांच्यामध्ये जवळीक वाढताना दिसते आहे. काही दिवसांपूर्वी हे दोन्ही नेते सप्ताहाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आले होते. तेव्हापासून या दोघांमध्ये पुन्हा जवळीक साधली जात असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्या चर्चेत आता पुन्हा एक भर पडली आहे. पंकजा मुंडे यांच्या एका संस्थेमध्ये धनंजय मुंडे यांची निवड झाली असून ही निवड बिनविरोध करण्यात आली आहे.
पंकजा मुंडे यांच्या जवाहर एज्युकेशन सोसायटीवर धनंजय मुंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या ३४ सभासदांसाठी निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी धनंजय मुंडे यांनी आपला अर्ज दाखल केला आहे. धनंजय मुंडे यांनी आश्रयदाता गटातून आपला अर्ज भरला आहे.
त्यांच्या विरोधात एकही अर्ज आला नसल्याने धनंजय मुंडे यांची बिनविरोध निवड करण्यात झाली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे व धनंजय मुंडे हे एकत्र येणार का याची सगळीकडेच चर्चा सुरु झाली आहे. पंकजा मुंडेच्या संस्थेवर धनजंय मुंडेंची बिनविरोध निवड झाल्याने इतर ३ जागांवर देखील बिनविरोध निवडणुक होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या विरोधात हितचिंतक गटातून एक अर्ज झालेला आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी जीएसटीच्या पथकाने पंकजा मुंडे यांच्या कारखान्यावर जीएसटी थकवल्याप्रकरणी धाड टाकली होती. पण धनंजय मुंडे यांच्या झालेल्या या निवडीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप