पीएम मोदींबद्दल आक्षेपार्ह लिखाण भोवलं; राऊतांविरोधात गुन्हा दाखल

यवतमाळ, १२ डिसेंबर २०२३ः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल पक्षाच्या सामाना या मुखपत्रातून आक्षेपार्ह लिखाण करणं खासदार संजय राऊत यांना चांगलंच महागात पडण्याची चिन्हे दिसत आहेत. पंतप्रधान मोदी यांची बदनामी होऊन देशाची प्रतिमा मलीन झाली, असा आरोप करत भाजपाचे यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी उमेरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी सजंय राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेने राजकारणात खळबळ उडाली आहे.

संजय राऊत यांनी आपल्या लेखात पीएम मोदी यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह आणि प्रक्षोभक विधानं केली. त्यामुळे पंतप्रधान मोदींची जागतिक पातळीवर बदनामी झाली. तसेच भारत हा धर्मविरोधी पक्ष आहे असे या लेखातून त्यांनी भासवले. राऊत यांचे लिखाण गंभीर स्वरुपाचे असून दोन धर्मात जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संजय राऊत यांना अटकक करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी भुतडा यांनी तक्रारीत केली होती. त्यांच्या या तक्रारीची दखल घेत उमरखेड पोलिसांनी राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर संजय राऊतही आक्रमक झाले आहेत. पंतप्रधान मोदी यांच्याविषयी आमच्या मनात आदराची भावना आहे. त्यांच्यावरील टीका राजकीय असते. व्यक्तिगत नाही. गृहमंत्री अमित शाह यांनी कलम ३७० च्या मुद्द्यावर माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यावर टीका केली होती. म्हणून मग कुणी आता अमित शहांवर गुन्हा दाखल करणार का, असा सवाल राऊत यांनी विचारला. या देशात लोकशाही आहे. अद्याप हुकूमशाही किंवा आणीबाणी लावलेली नाही. आमच्या जिभ कापून टाकलेल्या नाहीत, अशा शब्दांत संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले.

काय म्हणाले होते राऊत ?

संजय राऊत यांनी १० डिसेंबर रोजी दैनिक सामना वृत्तपत्रातील रोखठोक या सदरात पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. पाच राज्यांतील निवडणूक निकालावर राऊत म्हणाले होते, की इंडिया आघाडीस मरगळ झटकून दमदार पाऊल टाकायला लावणारे हे निकाल आहेत. देश खतरे में हैच्या गर्जना करून देशभक्तीसाठी भाजपाने मते मागितली असती. जवानांच्या शवपेट्यांना वंदन करण्याची छायाचित्रे फिरवून आपल्यासारखे आपणच. दुसरे कुणी नाही हे ठसवण्याचा प्रयत्न झाला असता.

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप