3 सप्टेंबरला ओबीसी विद्यार्थी वसतीगृहासाठी निवेदन देण्याचा निर्णय,नागपूरला पार पडली ओबीसी व्हीजेएनटी एसबीसी संघटनाची बैठक

नागपूर,दि.23/08/2022- ओबीसी,विजेएनटी, एसबीसी जनजागृती अभियान समितीची बैठक येथील सक्करदरा स्थित सेवादल महिला महाविद्यालयाच्या सभागृहात रविवार 21 ऑगस्टला पार पडली.या बैठकीत 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान निघालेल्या मंडल यात्रेचे अवलोकन करुन आढावा घेण्यात आला.तसेच ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या 3 सप्टेंबर रोजी विदर्भासह राज्यातील सर्व जिल्हा व तालुकास्थळावर निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला.बैठकीत जातीनिहाय जनगणना, वसतिगृहे,आर्थिक विकास महामंडळे, महाज्योती, मॅट्रिकपूर्व आणि मॅट्रिकेत्तोर शिष्यवृत्ती, परदेश शिष्यवृत्ती आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.तसेच विदर्भातील मंडल यात्रेत सहभागी झालेल्या सर्व संघटनांची एक समन्वय समिती तयार करुन पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यावर एकमत झाले.

 

 

ओबीसी, विजेएनटी, एसबीसी विद्यार्थ्यांचे 72 वसतिगृह मिळेपर्यंत सरकारने सप्टेंबर महिन्यापासून स्वाधार योजना लागू करावी यासाठी सर्व जिल्हा,तालुका स्तरावर 3 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना निवेदन स्थानिक पातळीवरील संघटना आपल्याच बॅनरवर देतील असेही ठरले.बैठकीला दिनानाथ वाघमारे,उमेश कोराम,खेमेंद्र कटरे,प्रा.रमेश पिसे, नंदकिशोर अलोने,गोपाल सेलोकर,कैलास भेलावे,मनोज चव्हाण,श्री हटवार,भुमेश शेंडे,विजय पटले,श्री मालेवार,पेमेंद्र चव्हाण,रमेश लांजेवार,प्रेम साठवणे,पियुष आकरे,श्री राठोड, मनिष नांदे,प्रतिक बावनकर,विशाल पटले,मनोज मेश्राम,धीरज भिसीकर,बाबा भसारकर,सप्तर्षी वंजारी,जगदिश दाते,राहुल बनोटे,पांडुरंग काकडे,पुरुषोत्तम कामडी,स्वाती अडेवार,मुकुंद अडेवार आदी उपस्थित होते.