ईडीच्या कारवाईला घाबरून आमच्याकडे येऊ नका- मुख्यमंत्री एकनाथ शिंदें

मुंबई, ३१/०७/२०२२: भाजपासह बंडखोर शिंदे गटावर ईडीचा दबाव दाखवून राजकीय नेत्यांना आपल्या पक्षात घेतल्याचा आरोप झाला. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट प्रत्युत्तर दिले आहे. ईडीने संजय राउत यांची रविवारी (३१ जुलै) सकाळी सात वाजता घरी जाऊन चौकशी केल्यानंतर त्यावर राजकीय प्रतिक्रिया आल्या आहेत.

 

स्वतः राऊतांनी ट्वीट करत ईडी कारवाई झाली तरीही शिवसेना सोडणार नाही, असं सूचक वक्तव्य केले आहे. यानंतर भाजपासह बंडखोर शिंदे गटावर ईडीचा दबाव दाखवून राजकीय नेत्यांना आपल्या पक्षात घेतल्याचा आरोप झाला. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट प्रत्युत्तर दिले. ईडीच्या कारवाईला घाबरून कुणी आमच्याकडे येत असेल तर येऊ नका, असे जाहीर आवाहन त्यांनी केले आहे.

 

शिंदे म्हणाले, “संजय राऊतांना कुणी आपल्या पक्षात बोलावले आहे का, आमंत्रण दिले आहे का? मी जाहीरपणे सांगतो, ईडीच्या कारवाईच्या भीतीने कुणीही येत असेल तर आमच्याकडे येऊ नका. शिवसेनेकडेही येऊ नका आणि भाजपाकडेही येऊ नका. आम्हाला दबाव टाकून कुणालाही पक्षात घ्यायचे नाही. अर्जुन खोतकर असू द्या, अन्यथा आणखी कुणी असू द्या मी जाहीर आवाहन करतो की ईडीच्या कारवाईला घाबरून कुणीही असलं पुण्याचं काम करू नका असेही त्यांनी सांगितले