मनोज जरांगेंची नार्कोटेस्ट करा नितेश राणेंची मागणी
मुंबई, २६ फेब्रुवारी २०२४ ः मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. फडणवीसांना माझा बळी पाहिजे, असं ते म्हणाले. त्यानंतर काल फडणवीसांना पत्रकार परिषदे घेत जरांगेंचे आरोप फेटाळून लावले. मात्र, जरांगेच्या आरोपावर अजूनही प्रतिक्रिया येत आहे. आता भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली. जरांगे यांची नार्को चाचणी करावी, मागणी करत फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी त्यांना १०० जन्म घ्यावे लागतील, असा पलटवार राणेंनी केला.
आज माध्यमांशी बोलतांना नितेश राणे म्हणाले की आजवर असंख्य लोक, मराठा क्रांती मोर्चा यांनी भूमिका घेत आंदोलन केलं. पण, एक व्यक्ती म्हणजे सरकार नाही. सगेसोयरेबाबत लवकरच निर्णय होईल. मात्र, मनोज जरांगे यांची नार्को चाचणी करावी म्हणजे संपूर्ण सत्य बाहेर येईल. ते कुणाच्या जीवावर शिव्या देत आहेत? देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी 100 जन्म घ्यावे लागतील, असं राणे म्हणाले.
राणे म्हणाले, काल जरांगेच्या एका साथीदाराला अटक करण्यात आली. ते राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या निकटवर्तीय असल्याची माहिती आहे. तसेच जरांगे हे शरद पवार यांच्या जवळचे असल्याचे त्यांचे जुने सहकारी सांगतात. त्यामुळेच जरांगे यांच्या तोंडून तुतारीचा आवाज बाहरे येत का, असा सवाल राणेंनी उपस्थित केला.
याशिवाय मनोज जरांगे यांनी राजकारण सोडून भूमिका घेतल्यास आम्ही सर्व समाज आणि त्यांच्या पाठीशी आहोत. मात्र आता सरकार घाबरले, सागर बंगल्यावर येण्याची घोषणा करणे हे चुकीचे आहे. सागर बंगल्यावर त्यांनी येणं ही लांबचीच गोष्ट आहे. कारण, सांगर र बंगल्यावर आमच्यासारख्यांची एक भिंत उभी आहे. जरांगेंना स्वप्नातही ही भिंत ओलांडता येणं शक्य नाही, असं राणे म्हणाले.
अंगावर गुन्हे घेऊ नका राणे म्हणाले, आमची मराठा समाजाशी कोणतीही लढाई नाही. आम्हीही मराठा समाजातून आलो आहोत. मात्र कोणी मराठा समाजाला वेठीस धरत असेल तर समाज ते खपवून घेणार नाही. जरांगेंच्या अवतीभवती असलेल्या तरुणांना माझा सल्ला आहे की, अंगावर गुन्हे घेऊ नका. कारण उद्या गुन्हा दाखल झाल्यावर तो मागे घ्यायला कोणी येणार नाही. जरांगे शिव्या देण्याची हिंमत कोणाच्या जोरावर करत आहेत, असा सवालही राणेंनी उपस्थित केला.
राणे म्हणाले, जरांगे हे फडणवीसांवर टीका का करतात? जी भाषा, जे मुद्दे शरद पवार आणि उद्धव ठाकरे काढतात, तीच भाषा जरांगे पाटील करतात. कॉपी अॅण्ड पेस्ट केल्यासारखं ते बोलतात. त्यामुळं जरांगे यांना स्क्रिप्ट इमेल, मेसेज कुठून येत आहे, हे बघावं लागेल, असा टोलाही राणेंनी लगावला.