आरक्षणाच्या पोरखेळाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

पुणे, २२ आॅगस्ट २०२२: स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांवर अन्याय करत, गोविंदा, विटीदांडू, मंगळागौरीच्या खेळास आरक्षणे वाटून पोरखेळ करणाऱ्या राज्य सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने फर्ग्युसन कॉलेज रोड येथे “जाहीर निषेध आंदोलन” घेण्यात आले.

 

“मुख्यमंत्र्यांनी “गोविंदा” ना शासकीय नोकरीत ५% आरक्षणाची घोषणा केली आहे. दहीहंडीला अगोदर साचेबद्ध पद्धतीने क्रीडाप्रकारात आणणे, त्यानंतर गोविंदा खेळाडूचे प्रमाण ठरवणे, खेळाला आणि खेळाडूला कागदोपत्री दर्जा प्राप्त करून देणे यासारख्या अनेक गरजेच्या बाबी यात आहेत , असे असताना अविचारीपणाने अश्या घोषणा करणे म्हणजे वर्षानुवर्ष या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या मुलांवर अन्यायकारक असे आहे. अगोदरच पदोन्नतीचं, ओबीसी, मराठा , मुस्लिम वर्गाचे आरक्षण हे विषय प्रलंबितच आहेत.त्यात केवळ दिखाऊपणा म्हणून अश्या घोषणा करत विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण केले जात आहे. त्यामुळे सदर निर्णय मागे घेण्यात यावा व स्पर्धा परीक्षांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कायमस्वरूपी धोरण ठरवण्यात यावे.निव्वळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यातील सत्ताधारी शिंदे व फडणवीस सरकार अशा प्रकारच्या लोकप्रिय घोषणा करत आहेत,असे अविचारी निर्णय घेणे राज्यातील सर्वोच्च पदावर बसलेल्या माणसाला शोभत नाही. थोडे विचार करून गोष्टी जाहीर करण्याचा सल्ला आम्ही आपणास देऊ इच्छितो. आपल्याकडे शेकड्याने IAS अधिकारी व कायदेशीर सल्लागार आहेत. त्यांच्याशी बोलून जरा शहाण्या लोकांचा सल्ला घेवून मग घोषणा कराव्यात,” असे मत शहराध्यक्ष श्री प्रशांत जगताप यांनी व्यक्त केले आहे .

 

या आंदोलनात विद्या गोट्या,भावरा,ल्युडो, विट्टी दांडू असे खेळ ,खेळत आरक्षणाची मागणी केली तर मंगळागौर खेळणाऱ्या स्त्रियांनी व डोंबाऱ्याचा खेळ खेळणाऱ्या कुटुंबाने देखील नोकरीत आरक्षण मिळावे अशी मागणी केली .

 

 

या आंदोलन प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अंकुशआण्णा काकडे, युवती सेलच्या अध्यक्षा सुष्माताई सातपुते, सौ.सायलीताई वांजळे,उदय महाले, प्रवक्ते प्रदीप देशमुख,मृणालिनी वाणी,संदीप बालवडकर,किशोर कांबळे,मनोज पाचपुते,अजिंक्य पालकर, विक्रम जाधव,महेश हांडे,अब्दुल हापिज,मंगेश मोरे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते