“एकनाथ शिंदेंमुळे राष्ट्रवादी फुटणार” – अजित पवारांची धावपळ

ठाणे, २ फेब्रुवारी २०२३ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला भागदाड पाडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांना एक ते दोन कोटी रुपये देऊन शिंदे गटात सहभागी करून घेतले जाणार असल्याचे समोर येतात राष्ट्रवादीमध्ये एकच खबर उडाली आहे. त्यामुळे पक्षाचे नेते अजित पवार यांनी विधानभवनात राष्ट्रवादीची बैठक बोलवून त्यामुळे कंट्रोल करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या या आरोपानंतर अजित पवार यांनी या नगरसेवकांची बैठक बोलावली. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना आपल्या पक्षात प्रवेश करण्यासाठी 1 ते 2 कोटींची ऑफर दिल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला या संपूर्ण प्रकरणाला गांभीर्याने घेत अजित पवार यांनी सर्व नगरसेवकांची एक बैठक घेतली. नगरसेवक फुटू नयेत किंवा ऑफरमुळे राष्ट्रवादीत फुट पडू नये यासाठी अजित पवार यांनी धावाधाव सुरु केली आहे.

या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, ठाण्यातील सर्व नगरसेवक, आमदार जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीसोबत सक्षमपणे उभे राहतील. मी आताच त्या बैठकीतून आलो. काही अडचण होईल असं मला वाटत नाही.त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड यांनी मला लवकरच अटक होणार असं सांगितल्यानंतर संपूर्ण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. तर या बैठकीत आव्हाड यांच्याशिवाय निवडणूक लढावी लागेल आणि जिंकावी लागेल. वेळ पडल्यास त्याच्याशिवाय तयारी करावी लागेल असं सांगण्यात आलं आहे. जितेंद्र आव्हाड म्हणतात, मला कधीही अटक होऊ शकते; काय आहे कारण?मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेलेले राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना अटक होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे. ठाणे महानगरपालिका निवडणुका होईपर्यंत मला आतमध्ये ठेवलं जावू शकतं. केंद्रातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी आपल्याला तसं सांगितलं असल्याचं आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर आव्हाडांनी हा दावा केला.

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, माझ्याविरोधात कुठलाही गुन्हा दाखल नाही. तरीही माझ्या अटकेचं षड्यंत्र सुरु आहे. ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या काळात जेलमध्ये ठेवलं जाऊ शकतं, असं ते म्हणाले. हिंदू जनआक्रोश मोर्चा निघाला खरा मात्र त्यासंबंधीचा कायदा आणण्यासाठी सरकारला कुणीही रोखलेलं नाही. हिंदू मुलींनाच धमक्या देणं योग्य नसल्याचं आव्हाड म्हणाले.सह्याद्री अतिथीगृहावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यापूर्वी यांनी मला अटक होऊ शकते, असा दावा केला आहे.यावेळी बोलतांना आव्हाड म्हणाले की, राज्यावर सध्या साडेसहा लाखांपेक्षा जास्तीचं कर्ज आहे. त्यामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती बरी नाही. अशीच आर्थिक परिस्थिती राहिली तर राज्यात दिवाळखोरी येईल, अशी भीती त्यांनी बोलून दाखवली.