नाना पटोले उद्धव ठाकरे यांनी न विचारता राजीनामा दिला – अजित पवारांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील बेबनावसमोर
पुणे, १२ मे २०२३ : “नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा न विचारता राजीनामा दिला. तसेच राजीनामा दिल्यावर माहिती देण्यात आली,” असा गंभीर आरोप विरोधीपक्ष नेते अजित पवारांनी केला. ते शुक्रवारी (१२ मे) पुण्यात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर यामध्ये शिंदे फडणवीस सरकारने अनेक गोष्टी बेकायदेशीर समोर आले. मात्र उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यामुळे सरकार सुरक्षित राहिल्याचे स्पष्ट झालेली आहे. तसेच नाना पटोले विधानसभा अध्यक्ष असताना त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून हे पद रिक्त होते आमदारांच्या फाटा फूट होण्याच्या शक्यतेमुळे महाविकास आघाडीने विधानसभा देशाची निवडणूक घेण्याचे टाळले होते. तसेच या संदर्भात न्यायालयात याची काही दाखल करण्यात आलेली होती याचाच निर्णय घेण्याच्यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या राजीनामामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्या संदर्भात अजित पवार पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
अजित पवार म्हणाले, “प्रतोद नेमण्यापासून अनेक गोष्टींना सर्वोच्च न्यायालयाने चुकीचं म्हटलं. मात्र, पुढे काय झालं? यामध्ये एक तर आमचे त्यावेळचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिला. तो राजीनामा त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना न विचारता देण्यात आला. राजीनामा दिल्यावर माहिती देण्यात आली. एक तर तो राजीनामा द्यायला नको होता. राजीनामा दिल्यानंतर लगेच पुन्हा विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेऊन तो विषय संपवायला हवा होता. तेही दुर्दैवाने आमच्या सगळ्यांकडून झालं नाही.”
“मी यासाठी एकट्याला दोषी धरत नाही. आमच्या महाविकासआघाडीकडून तो विषय तातडीने धसास लागला असता तर तिथं विधानसभा अध्यक्ष बसले असते आणि त्यांच्या अधिपत्याखाली या सर्व गोष्टी झाल्या असत्या. मोठा काळ विधानसभेचे उपाध्यक्ष काम पाहत होते. अध्यक्षांची जागा रिक्त राहिली होती,” असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं.
“या घटना घडल्यानंतर शिंदे-फडणवीसांनी पहिल्यांदा बहुमताच्या जोरावर ती जागा भरली. जर त्या जागेवर मविआचे नेते असते तर त्यांनी या १६ आमदारांना तेव्हाच अपात्र ठरवलं असतं”, असंही अजित पवारांनी नमूद केलं.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप