मध्यस्तीची माझी भूमिका संपली आता मी जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होणार बच्चू कडूंनी स्पष्ट केली भूमिका
अमरावती, २० जानेवारी २०४ : गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून लढा देत आहेत. मात्र, अद्यापही आरक्षणाचा तिढा न सुटल्यानं जरांगे पाटील मुंबईत उपोषण करणार आहेत. दरम्यान, कालपर्यंत सरकारचा प्रतिनिधी म्हणून जरांगेंशी संवाद साधणारे प्रहारचे आमदार बच्चू कडू हे देखील आता जरांगे पाटलांच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. सरकार म्हणून माझी भूमिका संपली, आता मी जरांगे पाटलांच्या आंदोलनता सहभागी होणार आहे, असं कडू म्हणाले.
आज मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथून मुंबईच्या दिशेने कूच केली. यावर बच्चू कडू यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, सरकारने सग सोयरेंबाबत आपली भूमिका स्पष्ट केली असून जरांगे पाटलांनी ती स्विकारली देखील. जरांगे-पाटलांनी सांगितल्याप्रमाणे सगे-सोयर्याच्या दुरूस्त्या करण्यात आल्या आहेत. वारंवार दुरूस्त्या केल्या आहे. काही दुरुस्त्या व्हायच्या आहेत. त्या दुरूस्त्यांवर सरकारने सहमती दर्शवली आहे. सगे सोयऱ्याचा प्रश्न मिटल्याचं जरांगेंनी सांगितलं, त्यामुळं सरकार निर्दयी झालं असं नाही.
कडू म्हणाले, ५४ लाख कुणबी नोंदी आढळल्यानं प्रमाणपत्रे देण्याची भूमिका जरांगे पाटलांनी घेतली. त्यासाठी सरकारने तशा सूचनाही दिल्या आहेत. मात्र, जात प्रमाणपत्र देण्यास वेळ लागेल. कारण, आधी अर्ज करावा लागले. त्यानंतर जात प्रमाणपत्र मिळणार… ही मोठी आणि किचकट प्रक्रिया आहेत. मात्र, सरकारकडून जात प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यवाही सुरू झाली आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे. जरांगे-पाटलांनी ज्या दुरुस्त्या सांगितल्या, त्या सर्व दुरुस्त्या करण्यात आल्या. त्यामुळं त्यांनी धोरणात्मक लढा जिंकला आहे, असं कडू म्हणाले.
बच्चू कडू म्हणाले, मराठा आरक्षणाची धोरणात्मक लढाई जरांगे-पाटलांच्या आंदोलनाने जिंकली आहे. कारण, यापूर्वी गावात तलाठी फिरत नव्हता, आता कमिटी जातीच्या नोंदी शोधण्यासाठी फिरते. त्यामुळं सरकारने आरक्षणासंदर्भात काहीच काम केलं नाही, असं म्हणता येणार नाही. त्यामुळं मला वाटतं त्यांनी उपोषण करू नये. मी अनेकदा त्यांची समजूत काढली. पण, माझी शिष्टाई कुठंतरी कमी पडली. सरकार म्हणून माझी भूमिका संपली आहे. जरांगे-पाटलांनी समाजाचं भलं होण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळं आता मीही मोर्चात सहभाही होणार आहे, असं कडू म्हणाले.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप