“माझा नंगानाच सुरूच राहील”- उर्फी जावेदचा चित्रा वाघ यांना टोला

मुंबई, ५ जानेवारी २०२३: मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद गेल्या काही दिवसांपासून एक वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ व उर्फीमधील वाद संपायचं काही नाव घेत नाही. “असा नांगनाच आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही.” असं म्हणत चित्रा वाघ यांनी उर्फीवर टिका केली. चित्रा वाघ यांनी पोलिसांत उर्फीविरोधात तक्रारही दाखल केली होती. त्यावर उर्फीने माझा नंगानाच सुरूच हाहिल असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

“उर्फीचा असला नंगानाच खपवून घेणार नाही. व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार चालला आहे. तुम्ही चार भिंतीच्या आत काय करता हा तुमचा खासगी प्रश्न आहे. पण मुंबईच्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी असा नंगटनाच जर कुणी करत असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही. यावेळी आम्ही पोलिसांत तक्रार केली आहेच. व्यक्तीस्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, पण यावर कारवाई व्हायलाच हवी.” असं पत्रकारांशी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या होत्या.

आता उर्फीचा मुंबई विमानतळावरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये पापाराझी छायाचित्रकार उर्फीला तुझ्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांना तू काय सांगशील? असं विचारतात.

यावर उर्फी म्हणते, “प्रेमाचं माहित नाही पण माझा नंगानाच सुरूच राहिल. उर्फीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी उर्फीला ट्रोलही केलं आहे. ही पागल मुलगी आहे, तुझं हे कृत्य लवकरच थांबवण्यात येईल, ही नेहमी विमानतळावर काय करते अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.