शिंदे गट, अजित पवार गटाला जनाधार नसल्यानेच मोदींचे महाराष्ट्रात वारंवार दौरे: संजय राऊतांची टीका

मुंबई, १९ जानेवारी २०२४: मुख्यमंत्री शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या मागे मतदार नाहीत हे प्रधानमंत्री मोदी यांनी समजून घेतल्यामुळे त्यांना वारंवार महाराष्ट्रात यावे लागते आहे. ज्या गटांना तुम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणतात. ते मिंदे गट आणि फजीत गट आहेत, त्यांना सोबत घेऊनही भाजपला काहीही फायदा होत नाही, अशा शब्दात ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी टीका केली.

लोकसभेच्या पाच जागा तरी मिळणार आहेत का? अशी त्यांची अवस्था आहे. त्यामुळे पंतप्रधान यांना येथे सतत प्रचारासाठी यावे लागत आहे. पंतप्रधान फार मोठे महान उदात्त हेतूने इथे येत नाहीत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येचा राम मंदिराचा दृष्टीने प्रचार करत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये येऊन येऊन राजकीय प्रचार करत आहेत. महाविकास आघाडी आणि इंडिया गटबंधन चा घेतलेला हा धसका आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा घोतलेला हा धसका आहे.

शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा घेतलेला हा धसक आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा हा धसका आहे. ४८ जागांवर पुन्हा एकदा मोदी हेच प्रचार करतील. मणिपूरमध्ये जर लोकसभेच्या २५ जागा असत्या तर ते मणिपूरला जाऊन थांबले असते. मणिपूरला लोकसभेच्या दोन जागा किंवा तीन जागा आहेत त्याच्यामुळे राजकीय दृष्ट्या त्यांना मणिपूर महत्त्वाचे नाही.प्रधानमंत्री आणि त्यांचा पक्ष हा फक्त लोकसभेच्या आकड्यांचा हिशोब करतो आणि राजकारण करतो.

उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात जागा आहेत, ८५ जागा आहेत. महाराष्ट्रात ४८ जागा आहेत म्हणून त्यांच्या या दोन जागेवर जास्त लक्ष आहे. पंतप्रधान यांनी माणिपूरला जायला हवे, प्रधानमंत्री यांनी काश्मीर खोऱ्यात जायला हवे. त्यांनी लडाखला देखील जायला हवे तिकडे चीन घुसला आहे. लक्षद्वीपला जाऊन वेळ घालवला आणि मालदीव सारख्या देशाची भांडण केले.हे सुद्धा राजकारण आहे जिथे राजकीय फायदा आहे. प्रधानमंत्री यांना व्यापक राष्ट्रहित, जनताहित, जनहित या सगळ्याचे त्यांना आणि त्यांच्या पक्षाला काहीच पडलेले नाही. असं म्हणत राऊतांनाी मोदी आणि भाजपवर निशाणा साधला आहे.

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप