गुजरात विधानसभा निवडणूकात आमदार शिरोळेंकडे मांगरोल मतदारसंघाची जबाबदारी
पुणे, १२/०९/२०२२: आगामी गुजरात विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाने सुरत जिल्ह्यातील मांगरोल विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्यावर सोपविली आहे.
भाजप गुजरात दक्षिण झोनची प्रवासी कार्यकर्ता बैठक सुरतमध्ये Surat वरीष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत आज (सोमवारी) झाली. आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी त्यात सहभाग घेतला.
पक्षाने यापूर्वी माझ्यावर एप्रिल २०२१ मध्ये पश्चिम बंगाल मधील बोलपूर विधानसभा मतदार संघ व जानेवारी २०२२ मध्ये गोवा येथील सेंट आंड्रे विधानसभा मतदार संघाची जबाबदारी सोपविली आणि आता गुजरात मधील मांगरोल विधानसभा मतदार संघाची जबाबदारी सोपविली आहे.
मिळालेल्या जबाबदारीतून मला देशाची व पक्षाची सेवा करण्याची संधी मिळते व या संधीचे सोने मी नक्कीच करेन, असा विश्वास शिरोळे यांनी व्यक्त केला.