
कल्याण-डोंबिवलीतील फसवणुकीनंतर महारेराचे मोठे पाऊल
मुंबई, दिनांक 24 एप्रिल 2025: महारेराने व्यापगत प्रकल्पांना पाठवलेल्या नोटिसेसला प्रतिसाद म्हणून 3699 प्रकल्पांनी त्यांचे प्रकल्प पूर्ण झाले असून त्यांना संबंधित नियोजन प्राधिकरणांकडून मिळालेले भोगवटा प्रमाणपत्र महारेरा संकेतस्थळावर अपलोड केल्याचे कळविले आहे. कल्याण – डोंबिवली भागातील गृहनिर्माण प्रकल्पातील फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सर्व भोगवटा प्रमाणपत्रे महारेराने संबंधित प्राधिकरणांकडून प्रमाणित करून घेण्याचे ठरविले आहे. याचाच भाग म्हणून सर्व संबंधित प्राधिकरणांना या प्रकल्पांचा तपशील पाठवून या प्रकल्पांना खरेच भोगवटा प्रमाणपत्र जारी केले का ? याची खात्री करून त्याबाबतची वस्तुस्थिती महारेराला पत्र मिळाल्यापासून 10 दिवसांत कळविण्याची विनंती करण्यात येत आहे.
विहित कालावधीत प्राधिकरणांकडून ज्या प्रकल्पांबाबत प्रतिसाद मिळणार नाही त्यांचे भोगवटा प्रमाणपत्र खरे आहे, असे गृहीत धरून या अनुषंगाने प्रकल्प पूर्ण झाल्याची प्रक्रिया महारेरा सुरु करेल. यात काही चुकीचे झाल्यास त्याची जोखीम आणि खर्चासह संपूर्ण जबाबदारी संबंधित प्राधिकरणाची राहील, असेही महारेराने या पत्रात स्पष्ट केलेले आहे.
यात पुणे परिसरातील 1223, मुंबई महाप्रदेशातील 1819 , नाशिक परिसरातील 273 , छत्रपती संभाजीनगर परिसरातील 132, अमरावती परिसरातील 84 आणि नागपूर परिसरातील 168 अशा एकूण 3699 प्रकल्पांचा समावेश आहे
प्रत्येक गृहनिर्माण प्रकल्पाला काही अटींसापेक्ष सदनिका विक्रीसाठी महारेरा कडे प्रकल्पाची नोंदणी करणे अत्यावश्यक आहे. तसेच प्रकल्प उभारणीच्या काळात त्रैमासिक प्रगती अहवाल, वार्षिक अंकेक्षण अहवाल सादर करावे लागतात. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर संबंधित प्राधिकरणाचे भोगवटा प्रमाणपत्र महारेरा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. हे भोगवटा प्रमाणपत्र महारेराने स्वीकारले की संबंधित प्रवर्तकाला त्या प्रवर्तकाच्या खात्यातील सर्व पैसे काढण्याचे स्वतंत्र असते. शिवाय त्यांना त्या प्रकल्पाच्या अनुषंगाने कुठलीही विवरणपत्रे भरावी लागत नाही.
पुणे क्षेत्र – 1223
पुणे – 1015
कोल्हापूर- 49
सांगली – 55
सातारा- 69
सोलापूर- 35
मुंबई महाप्रदेश क्षेत्र- 1819
मुंबई शहर- 106
मुंबई उपनगर- 430
पालघर- 175
रायगड- 415
रत्नागिरी- 86
सिंधुदुर्ग- 50
ठाणे- 557
नाशिक क्षेत्र – 273
नाशिक- 226
अहिल्यानगर- 23
धुळे- 3
जळगाव- 19
नंदुरबार- 2
छ. संभाजीनगर क्षेत्र- 132
छ. संभाजीनगर- 101
बीड- 3
जालना- 9
लातूर- 10
नांदेड- 5
धाराशीव- 3
परभणी- 1
अमरावती क्षेत्र- 84
अमरावती – 48
अकोला- 15
बुलडाणा- 7
वर्धा- 8
वाशिम- 1
यवतमाळ – 5
नागपूर क्षेत्र – 168
नागपूर- 144
भंडारा- 1
चंद्रपूर- 22
गडचिरोली – 1