बांधकामांच्या गुणवत्तेसाठी महारेरा कुठलाही कायदा करणार नसून – महारेराचा स्पष्ट खुलासा
मुंबई, १६/०९/२०२३: स्थावर संपदा क्षेत्रासाठी महारेरा किंवा या क्षेत्रातील कुठल्याही विनियामक प्राधिकरणाला स्वतंत्रपणे कायदा करण्याचा कुठलाही अधिकार नाही. परंतु या अधिनियमात असलेल्या तरतुदींची प्रभावीपणे अंमलबजावणी करता यावी यासाठी नियमावली (Regulation) करून त्याच्या अंमलबजावणीसाठी प्रमाणित कार्यपद्धती (SoP) ठरविण्याचा अधिकार आहे. त्यानुसार यापूर्वीच महारेराने 13 डिसेंबर 2022 च्या आदेशान्वये प्रमाणित विक्री करारात( Standardized Sale of Agreement) 4 तरतुदी अपरिवर्तनीय राहतील असे जाहीर केलेले आहे. यातील 5 वर्षांचा दोष दायित्व कालावधी ( Defect liability clause) यात विकासकाला बदल करता येणार नाही, असे जाहीर केलेले आहे.
या कलमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी नियमावली व त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रमाणित कार्यपद्धती ठरविल्यास प्रकल्पांच्या बांधकामाच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवता येईल, असे महारेराचे मत आहे .
महारेराचे अध्यक्ष अजोय मेहता यांचे कालच्या नरेडकोच्या कार्यक्रमातील विवेचन हे या अनुषंगाने होते.
महारेरा याबाबत कायदा करेल ,असे त्यांनी म्हटलेले नाही. ही बाब महारेराच्यावतीने स्पष्ट करण्यात येत आहे.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप