महाराष्ट्र: राज्यभरात होणार १५ हजार पोलिस शिपायांची भरती

पुणे, २७ ऑक्टोबर २०२२: गेल्या काही वर्षांपासून पोलिस शिपायांची भरती रखडली होती. अखेर भरतीचा मार्ग खुला झाला असून, शासनाने राज्यभरात १४ हजार ९५६ पदांची भरती केली जाणार असून, याची जाहिरात १ नोव्हेंबर रोजी काढली जाणार आहे.

राज्य सरकारने नुकतीच ७२ हजार पदांची भरणार असल्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. सरळसेवा भरती करताना क्षार गैरव्यवहार होऊ नये यासाठी ‘आयबीपीएस’ संस्थेद्वारे ऑनलाईन परीक्षा होणार आहे.

गेल्या पाच वर्षांत पोलिस दलात भरती झालेली नाही, दरवर्षी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचार्यांची मोठी असल्याने पोलिस दलात रिक्त पदांची संख्या वाढली. त्यातील परिणाम राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर होत आहे. राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यावर पोलिस भरती करणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार १४ हजार ९५६ इतकी पद संख्या निश्चित केली आहे.

यामध्ये सर्वाधिक मुंबई मध्ये असून ६ हजार ७४० जागा आहेत, पुणे शहरासाठी ७२०, पुणे ग्रामीण ५८९ मीरा-भाईंदर ९८६, तर नव्याने निर्माण झालेल्या पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयासाठी २१६ पोलिस शिपायांची जागा आहे. प्रत्येक पोलिस आयुक्तालय आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या हद्दीतील रिक्त जागांची जाहिरात १ नोव्हेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे.