महाबळेश्वर पाणी प्रदूषणाचा स्त्रोत समस्या व उपाय योजना

पुणे, ०५/०१/२०२४: मागील अनेक वर्षे महाबळेश्वरमधील स्थानिक रहिवासी व पर्यटकांना अतिसार, अन्नविषबाधा, श्वसनाचा तीव्र संसर्ग, बुरशीजन्य संसर्ग आणि टायफॉईड च्या आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत होते, आजारपणामुळे रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागत होते. लहान मुलांनचे लसिकरण करून सुद्धा रोटाव्हायरस सारख्या संसर्गाने ग्रासले होते, यामुळे रुग्णालय पुरेसी कार्यक्षम नसल्यामुळे मोठ्या आजारा साठी जिल्हा रुग्णालय किंवा पुणे मुंबई या सारख्या मोठ्या शहरात न्यावे लागते तसेच मधुमेही आणि इतर आजार असणाऱ्या लोकांनाही गंभीर संसर्गाचा समस्यांचा सामना करावा लागत आहे यावर उपाय योजना करणे गरजेचे आहे .

पुणे येथील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स या संस्थेने आपल्या सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट (सीएसडी) या संस्थेच्या माध्यमातून आरोग्य जोखीम मूल्यांकन संशोधन प्रकल्प हाती घेतला. गोखले इन्स्टिट्यूटच्या प्रो. डॉ. प्रीती मस्तकार व पाच रिसर्च असिस्टंट निखिल अटक, दिशा सावंत, रोहिणी सातपुते, सूरज भोळे आणि विनित दुपारे यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प राबविण्यात आला. यासाठी लागणारा सर्व वित्तीय खर्च गोखले संस्थेने केला आहे.

आम्ही काय केले ?
महाबळेश्वर व पाचगणी येथील आजारांची उत्पत्ती व व्याप्ती शोधण्यासाठी गोखले इन्स्टिट्यूटचे संशोधन पथक मे महिन्यात महाबळेश्वरयेथे दाखल झाले. त्यानंतर महाबळेश्वर व पंचगणी येथील सर्व रुग्णालयातील (खासगी/ प्राथमिक) आजारांच्या नोंदी तपासून स्थानिक आणि पर्यटक लोकसंख्येला, विशेषत: रोटाव्हायरसविरूद्ध लस घेतलेल्या मुलांच्या असुरक्षित लोकसंख्येला आरोग्याच्या उच्च जोखमीचे मूल्यांकन करून त्यांनी रोगांच्या कारणांची तपासणी करण्यास सुरवात केली.

आम्हाला काय आढळले:
महाबळेश्वर व पाचगणी या दोन्ही शहरांचा पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत असलेल्या वेण्णा तलावाच्या पाण्यासह इतर सर्व स्त्रोत, जलशुद्धीकरण केंद्रे, घरे, व्यावसायिक आस्थापना व भूजल यांचे सखोल नमुने घेण्यात आले. सर्व पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये भूजलासह इतर नमुन्या मध्ये उच्च स्तरावरील प्रदूषण निदर्शनास दिसून आले. त्यानंतर संशोधकांच्या पथकाने या प्रदूषणाचा स्त्रोत शोधण्यास सुरवात केली, तो म्हणजे घोड्यांचा विष्ठा युक्त कचरा जो वेण्णा तलावाच्या अगदी वर उभ्या असलेल्या घोड्यांन मूळे पाण्यात मिसळला जातो. तसेच तलावाभोवती व रस्त्यावर घोडेस्वारी साठी फिरणाऱ्या घोड्यांमुळे पाण्यानजीक होणाऱ्या इतर रहदारी मूळे याचा संपर्क थेट पाण्याशी येत आहे असे आढळून आले तसेच महाबळेश्वरमधील सर्व रस्त्यांवर आणि पाण्याच्या पाईपलाईनलगत घोड्यांचा विष्टायुक्त कचरा आढळतो . घोड्याच्या विष्टे मध्ये इतर प्रदूषणाव्यतिरिक्त विषाणू आणि जीवाणू असतात, त्यामुळे पानी अत्यंत दूषित होते व अनेक आजार व समस्यांचे कारण.

आमच्या शिफारशी आणि उपाय धोरणे:
पर्यटकांच्या संख्येवर अवलंबून असलेल्या महाबळेश्वरच्या व्यावसायिक कामकाजात अडथळा न आणता प्रदूषण रोखण्यासाठी पथकाने काही उपाय योजना शोधून काढल्या आहेत.
उपाय धोरणांमध्ये खालील बाबीं समाविष्ट आहेत –
• पाण्याच्या स्त्रोतापासून प्रदूषण करणारे घटक वेगळे करणे.
घोड्याच्या क्रियाकलापांसाठी एक चांगले स्थान जे त्यांना घोडेस्वारी आणि प्रशिक्षण केंद्रासारखे वापर केल्यास चांगले आणि स्थिर उत्पन्न देऊ शकते जे स्थानिक शाळा, महाविद्यालये आणि लोकसंख्या, पर्यटक आणि स्थानिक दोघांनाही सेवा देऊ शकते आम्ही सुचविल्या प्रमाणे पोलो ग्राॉऊंड ही उत्तम ठिकाण आहे.
• घोड्याच्या विष्टेचा वापर करून बायोगॅस आणि विज निर्मिती करू शकेल अशा बायोगॅस प्रकल्पाची तरतूद करता येईल. घोडेमालकांनी सर्व हा विष्टा युक्त कचरा गोळा केल्यास हा बायोगॅस कम्युनिटी किचनसाठी गॅसच्या स्वरूपात घोडामालक समाजाला मोफत दिला जाऊ शकतो घोड्याचा कचरा, बायोगॅस प्लांटला इनपुट म्हणून कचरा गोळा करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणे गरजेचे आहे.
• महाबळेश्वर आणि पाचगणी या दोन्ही ठिकाणच्या व्यापारी वर्गाचा सहभाग त्यांना पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत स्वच्छ ठेवण्यास खआणि उपाय योजना राबविण्यास निश्चितच मदत होईल.

केलेली कारवाई :
साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी आणि महाबळेश्वरचे सीओओ आणि महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी पाटील यांना विस्तृत संशोधन अहवाल सादर करण्यात आला. या सर्वांनी गोखले इन्स्टिट्यूटने केलेल्या महत्त्वपूर्ण संशोधन कार्याचे स्वागत करून तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. गोखले इन्स्टिटय़ूट टीमने सुचविलेल्या उपाययोजनांनुसार महाबळेश्वरमध्ये बदल होत आहेत, ट्रीटमेंट प्लांटची दुरुस्ती केली जात आहे, वेण्णा तलावाच्या लगत असणारी दुकाने अतिरिक्त तसेच दूषित पाण्यामुळे आरोग्यास धोका निर्माण होत असल्याने व अनधिकृत क्षेत्रामध्ये स्थित असल्यामुळे हटविण्यात आली आहेत.

निष्कर्ष:
महाबळेश्वर येथील दूषित पिण्याच्या पाण्यामुळे होणाऱ्या आरोग्य निगडीत समस्यांचे मूल्यांकनाचे महत्त्वाचे संशोधन कार्य गोखले संस्थेने स्वखर्चाने पूर्ण करून स्थानिक व पर्यटक लोकसंख्येला, विशेषत: लहान मुले, मधुमेही यांच्या असुरक्षित लोकसंख्येला होणारा आरोग्याचा धोका कमी करण्यासाठी आणि परिसरातील शाश्वततेला चालना देण्यासाठी महाबळेश्वर शहर साठी प्रयत्न केले आहेत .