महाविकास आघाडीच जागा वाटप ठरल, पवारांना सर्वात कमी जागा

मुंबई, 15 ऑक्टोबर 2024 : निवडणूक आयोगाकडून आज (दि.१५) दुपारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले असून, यात झारखंडसह महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व घडामोडींमध्ये जागा वाटपाच्या चर्चांनी जोर धरला असून, लोकसभेत १० पैकी ८ जागांवर विजय मिळवलेला पवार गट विधानसभेत फक्त ७५ जागा लढवणार असल्याचे सांगितले जात आहे. शरद पवारांची ही गुगली सर्वांनाच बुचकळ्यात टाकणारी असल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणपुकांसाठी महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा फॉर्मुला जवळपास निश्चित झाल्याची चर्चा आहे. त्यानुसार त्यानुसार मविआत काँग्रेसला सर्वाधिक ११९ ठाकरे गटाला ८६ तर, शरद पवार गटाला ७५ अशा पद्धतीने जागांचे वाटप केले जाणार आहे. तर शेकापला ३, समाजवादी पक्ष ३ आणि कम्युनिस्ट पक्षाच्या वाट्याला २ जागा येणार आहेत.

शरद पवार यांनी मराठावाडा, पश्‍चिम महाराष्ट्रात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते फोडून स्वतःच्या गटात समाविष्ट करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे महायुती बॅकफुटवर गेली आहे. पण आता जागा वाटपात शरद पवार यांनी महाविकास आघाडीत सर्वात कमी ७५ जागा घेण्याचा निर्णय घेतला आहे.