‘खादी फॉर नेशन’ पण राष्ट्रध्वजासाठी चिनी पॉलिस्टर! राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका म्हणाले
नवी दिल्ली, २८/०८/२०२२- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासीयांना खादी वापरचा मुद्दा उपस्थित करत, खादीचा वापर वाढवून खादी ग्रामउद्योगास बळकटी देण्यास हातभार लावण्याचे देशवासियांना आवाहन केले आहे. मात्र, काँग्रेस नेते राहुल गांधींनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.‘खादी फॉर नेशन’ पण राष्ट्रध्वजासाठी चिनी पॉलिस्टर! नेहमीप्रमाणे पंतप्रधानांचे शब्द आणि कृती कधीच जुळत नाही.’ असे ट्वीट राहुल गांधी यांनी केले आहे.
मोदी यांनी आगामी सणांमध्ये खादी ग्रामोद्योगात बनवलेली उत्पादनेच एकमेकांना भेट म्हणून द्या. तर, आम्ही खादी फॉर नेशन, खादी फॉर फॅशनमध्ये खादी फॉर ट्रान्सफॉर्मेशनचा संकल्प जोडला असल्याचेही सांगितले.‘स्वातंत्र चळवळीच्या वेळी ज्या खादीला महात्मा गांधींनी देशाचा स्वाभिमान बनवले. तीच खादी स्वातंत्र्यानंतर न्यूनगंडाच्या गर्तेत अडकल्याचे दिसत आहे. ज्यामुळे खादी आणि खादीशी निगडीत ग्रामोद्योग पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. खादीची ही अवस्था विशेषतः गुजरातसाठी अत्यंत क्लेशदायक आहे. आम्ही खादी फॉर नेशन, खादी फॉर फॅशनमध्ये खादी फॉर ट्रान्सफॉर्मेशनचा संकल्प जोडला. गुजरातमधील यशाचे अनुभव आम्ही देशभर पसरवायला सुरुवात केली. देशवासीयांना खादी उत्पादने खरेदी करण्यास प्रोत्साहित केले.’