जरांगें वेडे अन् जानकरांचं जीपीएस हुकलेलं; एका बाणात हाकेंचा दोघांवर बोचरा वार

पुणे, २ नोव्हेंबर २०२४ : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी विधानसभेसाठी उमदेवार उभे करणार असल्याची घोषणा केली आहे. नेमके किती आणि कोणते उमेदवार जरांगे निवडणुकीच्या रणांगणात उतरवणार याची अंतिम यादी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, त्यापूर्वी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी जरांगेंचा मास्टर प्लान फोडून मोकळे झाले आहेत. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

हाके म्हणाले की, जरांगे आज एक बोलतील आणि उद्या एक बोलतील. पण, ते काही निवडणुकीसाठी उमेदवार वगैरे देणार नाही. एवढचं काय तर ते ४ नोव्हेंबरनतंर हॉस्पिटलमध्ये सलाईन लावून अॅडमिट असतील असा दावादेखील हाके यांनी केला आहे. मनोज जरांगेंना राजाकारणातील ज्ञान शून्य असून, ते वेडे आहेत काहीही बरळतात असा बोचरा वारही हाके यांनी केला,

त्यांच्या उमेदवारांची वाट बघतोय

जरांगे यांनी उमेदवार उभे करावेत याची मी वाट बघत असून, कुठल्या लोकांना मतदान करायचे नाही त्याची यादी तयार असल्याचेही हाके यांनी सांगितले. तसेच काही ठिकाणी आमचे उमेदवार निवडणुकीच्या मैदानात असतील असेही हाके यांनी स्पष्ट केले.

मनोज जरांगे हा भंपक माणूस, त्यांची माझ्यावर बोलण्याची लायकी; लक्ष्मण हाके संतापले

सर्वच राजकीय पक्षांचे ओबीसी समाजाकडे दुर्लक्ष

पुढे बोलताना हाके म्हणाले की, आज प्रत्येकजण जरांगेंची भेट घेण्यासाठी अंतरवाली सराटीमध्ये दाखल होत आहे. पण, ओबीसींकडे या राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी, नेत्यांनी दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे ओबीसी सामाजातील नागरिकांना माझी विनंती आहे की, आता जर तुम्ही घरात बसलात तर, २०२४ नंतर ओबीसींचे आरक्षण संपलेले असेल. पण, याबाबत योग्य ती दिशा आम्ही ओबीसींना दिली असून, ते मतपेटीतून दाखवून देतील असेही हाके यांनी सांगितले.

आमचे उमदेवार तयार

विधानसभेसाठी आमचे उमदेवार तयार असून, कुणाला मतदान करायचे आणि कुणाला द्यायचे नाही याचं नियोजन तयार असून, यात रोहित पवार, तानाजी सावंत आणि राजेश टोपे संदीपान भुमरे या नेत्यांना ओबीसींचे एकही मत पडणार नाही. या नेत्यांशिवाय बीड आणि जालना जिल्ह्यातील अनेका आमदारांची नावेदेखील यादीत नमुद असल्याचे हाके म्हणाले. या सर्वांचा खुलासा ४ तारखेला होईल असे म्हणत या राज्यातील ओबीसींचा काय अंडर करंट आहे हे तुम्हाला दिसेल यासाठी योग्य ती दिशा ओबीसी समजाला दिली असून, ती ओबीसी मतपेटीतून निश्चित दाखवेल असा विश्वास हाकेंनी व्यक्त केला.