समाजासाठी वेळ देणाऱ्या लोकांना ताकद देण ही आपली जबाबदारी – जरांगेंच्या भेटीनंतर संभाजीराजे यांचा विश्‍वास

छत्रपती संभाजीनगर, 06 नोव्हेंबर: आपल्या जिवापेक्षा समाज मोठा असतो. समाजासाठी जो वेळ देतो, अशा लोकांना ताकद देणं, बळ देणं ही आपली जबाबदारी असल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. हेच छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहु महाराज यांचे संस्कार आहेत असेही यावेळी संभाजीराजे म्हणाले. संभाजीराजेंनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन छेडलेल्या मनोज जरांगे पाटील यांची छत्रपती संभाजीनगरमधील हॉस्पिटलमध्ये भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

संभाजीराजे म्हणाले की, सर्व मंत्रिमहोदय या ठिकाणी येऊन मराठा आंदोलक जरांगे पाटील यांच्या चर्चेतून योग्य मार्ग निघेल. शासनाकडून काहीतरी जीआर जरांगे पाटील यांच्यासमोर दिला आहे. माझी भूमिका मी यापूर्वीच स्पष्ट केली आहे. गरिब मराठा समाजाला न्याय मिळावा हीच आपली अपेक्षा आहे. याबद्दल सविस्तरपणे मनोज जरांगे बोलतील असेही यावेळी संभाजीराजेंनी सांगितले.
त्याचवेळी पत्रकारांनी संभाजीराजेंना आपलं सरकारशी याबद्दल काही बोलणं झालं का? असा प्रश्न विचारला. त्यावर संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, सरकारशी किती बोलायचं अन् किती भेटायचं? असाही सवाल उपस्थित केला. हे सरकार असो की मागचं सरकार असो.

आपण तर २००७ पासून सांगत आहे की, समाजाला कसा न्याय मिळवून देता येईल. पण मनोज जरांगे यांच्या माध्यमातून जो लढा उभा राहिला आहे, समाज देखील त्यांच्याकडे एका विश्वासाने पाहतो. आणि त्यांची तब्ब्येत चांगली असावी, म्हणून मी त्यांना भेटायला आलो होतो. ज्या मागण्या मनोज जरांगे यांनी पुढे केल्या आहेत, त्या मान्य होतील, असाही विश्वास यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला.
संभाजीराजेंनी मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, जरांगे पाटील यांच्या लिव्हर आणि किडनीची सूज आज कमी झाली आहे. त्याचवेळी जरांगे पाटील पूर्णपणे बरे झाल्याशिवाय त्यांना डिस्चार्ज देऊ नये, असेही यावेळी संभाजीराजेंनी डॉक्टरांना सल्ला दिला.

त्याचबरोरबर संभाजीराजेंनी सांगितले की, सरकारने जरांगेंच्या हाती जीआर दिला आहे. आपली भूमिका तर आम्ही यापू्र्वीच स्पष्ट केली आहे. गरीब मराठ्यांना न्याय मिळावा हाच आपला दृष्टीकोन असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जरांगेंच्या मागण्या पूर्ण होतील हा माझा विश्वास आहे. समाजासाठी वेळ देणाऱ्या लोकांना ताकद देण्याची आमची जबाबदारी असून सगळं योग्य रुळावर आहे, मार्ग नक्की निघेल, हा विश्वासही यावेळी संभाजीराजे छत्रपतींनी व्यक्त केला आहे.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप