सभेत घुसून दाखवा आणि ५१ हजार रुपये बक्षीस मिळवा
जळगाव, २२ एप्रिल २०२३ : जळगाव येथे होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेत उद्धव ठाकरे यांना रोखण्याची भाषा शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केल्यानंतर त्यांना आता ठाकरे गटाकडून सभेत घुसून दाखवा आणि ५१ हजार रुपयांचे बक्षीस मिळवा आव्हान देण्यात आले आहे.
उद्धव ठाकरे जळगाव जिल्ह्यात येत आहेत. येथे त्यांनी जाहीर सभा होणार आहे. मात्र, या सभेआधीच राजकारण तापले आहे. उद्धव ठाकरे यांचे जळगाव जिल्ह्यात स्वागत आहे. मात्र, त्यांच्या सभेत संजय राऊत जर माझ्यावर बोलले तर मी थेट त्यांच्या सभेत घुसेन, असा इशारा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला होता.
आता त्यांच्या या इशाऱ्याला ठाकरे गटानेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सभेत घुसून दाखवा आणि ५१ हजार रुपये बक्षीस घेऊन जा, असे चॅलेंजच गुलाबराव पाटील यांना दिले आहे
उद्या ठाकरे उद्या (रविवार) जळगाव दौऱ्यावर येत आहेत. माजी आमदार आर. ओ. तात्या पाटील यांच्या पुतळा अनावर कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत. संजय राऊतही यावेळी हजर असतील. ते आधीच जळगावात दाखल झाले आहेत. या कार्यक्रमानंतर जिल्ह्यातील पाचोरा येथे उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. मात्र, या सभेआधीच राजकारणाचा पारा चढला आहे.
काय म्हणाले होते पाटील ?
या दौऱ्यावर टीका करताना पाटील म्हणाले होते, माझे मित्र आर. ओ. पाटील यांचे माझ्यावर खूप उपकार होते. त्यांच्या पुतळा अनावरणासाठी उद्धव ठाकरे येत आहेत. आर. ओ. पाटील आणि उद्धव ठाकरे यांचे आधीपासूनचे संबंध होते. त्या प्रमापोटी ते येत आहेत. उद्धव ठाकरे यांचे जिल्ह्यात स्वागत आहे. मात्र त्यांच्या सभेत जर संजय राऊत माझ्यावर बोलले तर मी थेट त्यांच्या सभेत घुसेल, असा इशारा पाटील यांनी दिला होता.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप