शरद पवारांच्या समोर रडण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांच्या पुढे रडा – अजितदादांनी सुषमा अंधारेंना फटकारले

पुणे, १२ मे २०२३: “सुषमा अंधारे कुठल्या पक्षात आहेत?, ठाकरे गटात आहे. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते ठाकरे गटाचे आहेत. पवारांसमोर रडण्यापेक्षा, त्यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे अंबादास दानवे यांच्यासमोर रडणे योग्य ठरले असते अशा शब्दात विधी पक्ष नेते अजित पवार यांनी ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांना फटकारले.

सातारा येथे कार्यक्रमात शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोरच अश्रू अनावर झाले. शरद पवार यांच्यासमोर भाषण करताना सुषमा अंधारेंनी पवारांनी कशी मदत केली याचा एक किस्सा सांगितला. हे सांगताना त्या भावनिक झाल्या आणि ढसढसा रडल्या. तसेच यावेळी
इथं राजकारणाचा विषयच नाही, पण आवर्जून सांगणं गरजेचं आहे. आमदार अश्लाघ्य पद्धतीने माझ्याबद्दल टीपण्णी करतात आणि एकाही पोलीस स्टेशनला त्याची तक्रार लिहून घेतली जात नाही. सभागृहात आपण सगळे विरोधी पक्षनेते म्हणून बाकावर बसतो. तेव्हा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी माझ्यावरील अश्लाघ्य वक्तव्याविरोधातील तक्रार का नोंदवली नाही असा प्रश्न विचारायला हवा होता.” अशा शब्दात अजित पवार यांच्यावर टीका केली होती.

पुण्यात अजित पवार हे कार्यक्रमानिमित्त उपस्थित झालेले असताना त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला सुषमा अंधारे यांनी तुमच्याबद्दल तक्रार केली असे विचारले असता तेव्हा म्हणाले, सुषमा अंधारे कुठल्या पक्षात आहेत?, ठाकरे गटात आहे. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते ठाकरे गटाचे आहेत. पवारांसमोर रडण्यापेक्षा, तिथे भावनिक होण्यापेक्षा ते ज्या पक्षाचे काम बघतायेत, काकारे, मामारे करत ज्या पक्षासाठी भाषण करतात. त्यांच्या उद्धव ठाकरेंना सांगा. उद्धव ठाकरेंसमोर रडला असता आणि अंबादास दानवेंना मुद्दा उपस्थित करायला सांगितला असता तर योग्य ठरले असते. विधानसभा विरोधी पक्षनेत्याप्रमाणे विधान परिषदेच्या पक्षनेत्यालाही अधिकार आहे.”

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप