आजच्या सोहळ्यात फक्त तिघांचा शपथविधी; मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर

मुंबई, ५ डिसेंबर २०२४: महाराष्ट्रात आज नवीन सरकार स्थापन होत असताना सायंकाळी पाच वाजता मुंबईतील आझाद मैदानावर प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीमध्ये शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार आहेत. मात्र आजच्या सोहळ्यात केवळ तिघांचे शपथविधी होणार आहेत. अन्य कोणाचेही शपथती होणार नाहीत त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लामणीवर पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल लागल्यानंतर राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे लक्ष लागलेले होते. दहा ते बारा दिवस नाट्यमूळ घडामोडी घडल्यानंतर अखेर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेले आहे. देवेंद्र फडणवीस आज सायंकाळी पाच वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, त्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार हे देखील शपथ देणार आहेत. तिसरी शपथ शिवसेनेतून कोण घेणार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार की अन्य कोणाला या पदावर बसवण्यात याकडेही लक्ष लागलेली आहे.

राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागावी यासाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील मातब्बर नेते प्रयत्नामध्ये आहेत. भाजपचे २० ते २२, शिवसेनेचे दहा ते पंधरा आणि अजित पवारांचे सुमारे दहा जण मंत्री पदाची शपथ घ्यायची शक्यता आहे. पण यांचा शपथविधी आज पार होणार पडणार नाही. ७ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल त्यावेळेस अन्य मंत्र्यांना शपथ दिली जाईल. त्यामुळे आणखीन दोन दिवस हे नेते गॅसवर असणार आहेत.