महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीची निर्विवाद सत्ता भाजपला 129 जागांवर बढत

मुंबई, २३ नोव्हेंबर २०२४: लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा महायुतीचा दारुण पराभव झाला होता. मात्र त्याचा वचपा महायुतीने विधानसभेच्या निवडणुकीत काढल्याचे दिसून आलेले आहे. विधानसभा निवडणुकीचे कल जवळपास स्पष्ट झाले असून राज्यात महायुतीने 224 जागांवर मुसंडी मारलेली आहे. यामध्ये भाजपला 129 जागा मिळाल्याचे दिसून येत आहे. तर महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष अवघ्या 54 जागांवरच थांबलेले आहेत. त्यामुळे शरद पवारांसारख्या वस्तादाचे डाव फेल गेले आहेत. तर देवेंद्र फडणवीस यांची चाणक्य नीति यशस्वी झाल्याचे समोर आलेले आहे.

आज सकाळपासून विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झालेली आहे. सुरुवातीच्या कलानुसार भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी या महायुतीने राज्यभरात जोरदार मुसंडी मारलेली आहे. मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी महायुतीचे उमेदवार चांगल्या मतांनी आघाडीवर आलेले आहेत.

तर या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला चांगले मतदान मिळेल आणि राज्यात सत्ता येऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात होती. पण महाविकास आघाडी सत्तेपासून खूप लांब राहिली असून महायुतीला निर्विवाद यश मिळणार असल्याचे समोर आलेले आहे.

दुपारी बारापर्यंत आलेल्या कलानुसार राज्यात 224 जागांवर महायुती यामध्ये भाजप 129, शिवसेना 57, अजित पवारांची राष्ट्रवादी 38 तर काँग्रेस 18, ठाकरे गट 17, शरद पवार 19 व इतर दहा जण निवडून याच्या मार्गावर आहेत महायुतीला एकूण 224 महाविकासागर केवळ 54 जागा दाखविल्या जात आहेत.