आपण मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरावा, त्यास माझा पाठिंबा: उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

मुंबई, १६ ऑगस्ट २०२४ ः गेली अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल अशी चर्चा आहे. उद्धव ठाकरे होणार की आणखी कोण होणार अशी ही चर्चा आहे. परंतु, या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते शरद पवार आहेत, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण उपस्थित आहेत. यांना माझं सांगण आहे की आपण करा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर माझा त्याला पाठिंबा असेल असं उद्ध ठाकरे म्हणाले आहेत. मला मुख्यमंत्री पदाबाबत स्वप्न पडत नाहीत. तशी इच्छा बाळगूनही मी काम करत नाही. त्यामुळे आपण जो कोणी चेहरा जाहीर कराल त्याला माझा पाठिंबा असणार आहे असा पुनरउच्चार उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला आहे. ते महाविकास आघाडी पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते.

आम्ही शिवसेना म्हणून भाजपसोबत होतो. त्यामध्ये जो आम्हाला अनुभव आला तो महाविकास आघीडमध्ये यायला नकोय. कारण ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असं धोरण ठरलं. त्यामुळे युतीमध्येच याची ही जागा पाडा ती जागा पाडा यामध्ये आम्ही स्वत:च्याच पायावर धोंडा टाकून घेताल आहे. त्यामुळे हे धोरण महाविकास आघाडीत नको. आगेदर ठरवा आणि चला पुढे मला काही प्रॉब्लेम नाही असं म्हणत थेट मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषीत करावा अशी मागणीच यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

५० हजार योजना दूत हे नेमणार आहेत. त्यातही योजना पोहचवणाऱ्यांना १० हजार रुपये महिना आणि महिलांना दीड हजार महिना दिला जातोय. म्हणजे पाहा जनतेला कसं लुटलं जातय असा थेट घणाघातही उद्धव ठाकरे यांनी केला आहे. तसंच, हेज जर अशा पद्धतीने जनतेचा पैसा उधळणार असतील तर आपण महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या काळातील काम का लोकांपर्यंत पोहचू शकत नाहीत असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना केली आहे.

आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा
विधानसभेला ज्याचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री असे धोरण काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राहिले आहे. या दोन्ही पक्षांकडून तिच भूमिका घेतली जात आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोणालाही जाहीर करा, माझा पाठिंबा असेल असे भाषणात सांगितले. पण थोड्यावेळाने ज्याच्या जागा जास्त होतील त्याचा मुख्यमंत्री हे धोरण राबवण्यापेक्षा अगोदर मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरवा आणि पुढे चला. त्यासाठी माझी काहीही हरकत नाही असे सांगून सर्वांना संभ्रमात टाकले आहे.