यश आले तर ठीक, अन्यथा समोर जायचे – अजित पवार
पुणे, ९ फेब्रुवारी २०२३ : कसबा विधानसभा मतदारसंघाता बंडखोरी रोखण्यात यश आले आहे. प्रयत्न करण हे आपल्या हातामध्ये आहे. चिंचवडमध्ये देखील तो प्रयत्न सुरू असून, यश आले तर ठीक, अन्यथा समोर जायचे, अशी भूमिका राष्टवादीचे नेते अजित पवार यांनी मांडली.भाजपचे पदाधिकारी बंडखोरी करणाऱ्या कॉंग्रेसच्या बाळासाहेब दाभेकर यांना भेटले यात राजकारण आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बंडखोरी केली तर मतांची विभागणी होणार आणि त्यांचा फायदा भाजपला होणार, असं भाजपच्या नेत्यांना वाटणार त्यामुळे ते कॉंग्रेसच्या नेत्यांना जाऊन भेटत आहेत असेही ते म्हणाले.
शिंदे फडणवीस सरकारमध्ये जाहिरातबाजीवर सर्वाधिक खर्च झाल्याची माहिती समोर आली. त्या प्रश्नावर विरोधीपक्षनेते अजित पवार म्हणाले की, हे सर्व सामन्यांचे सरकार आहे. जाहिरातबाजी केल्याशिवाय सर्व सामन्यांना कसे कळणार. त्यावर लवकरच भूमिका मांडणार आहे. मी देखील अर्थमंत्री म्हणून काम केल आहे. कुठे खर्च केला पाहिजे, कोणत्या गोष्टीला प्राधान्य दिले पाहिजे, जो दुर्लक्षित वंचित वर्ग आहे, त्या करिता खर्च केला पाहिजे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करून शुभेच्छा दिल्या. मी त्यांचा टाईम्स स्क्वेअर ठिकाणी फ्लेक्स पाहिला. आपल्या मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस टाईम्स स्क्वेअरवर साजरा होत आहे, सर्व सामन्यांचे मुख्यमंत्री सर्वदूर पोहोचले, अशी मिश्कीलपणे टिपणी त्यांनी केली.
पुण्यातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक संपर्कात असल्याचे भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सांगितले. त्यावर पवार म्हणाले, त्याबद्दल त्यांना शुभेछा, ‘बेस्ट ऑफ लक’ .
शहरात अद्यापही कोयता गँगची चर्चा आहे. त्यावर अजित पवार म्हणाले, हिवाळी अधिवेशनात कोयता गँगबाबत प्रश्न उपस्थित केल्यावर पुणे पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. कोयता गँगविरोधात कारवाई सुरू केली असून, एक तर तडीपार किंवा मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल केले जात आहेत.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप