मी १५ दिवसांतून एकदा बोलतो : छगन भुजबळ

नाशिक, ६ डिसेंबर २०२३ : “मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे- पाटील सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांचेदेखील ओबीसी आरक्षणाला हे दररोजच बोलत असतात. मी मात्र पंधरा दिवसांतून एकदा उत्तर देतो. मी काही जाळपोळ करत नाही, बंदुका व गुंडांना घेऊन फिरत नाही”, अशी टीका अन्न व नागरी पुरवठा मंत्री व ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलन म्हणून जरांगे पाटील यांच्यावर केली.

ओबीसीमध्ये मागच्या दाराने प्रवेश करण्यास आमचा विरोध आहे. मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, त्यास आमचा विरोध नाही. लोकशाही मार्गाने मला जे अधिकार मिळाले आहेत, त्यानुसार मी बोलत आहे. पण मराठा समाजाला मागच्या दारातील ओबीसीचा प्रवेश आम्ही न्यायालयात रद्द करू. मराठा. समाजाला वेगळे आरक्षण दिले पाहिजे, ही आमची भूमिका मी माझी भूमिका मांडतो,” असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

” भिडे वाड्याबद्दल छगन भुजबळ म्हणाले, भिडे वाड्यासाठी २० वर्षे लढा सुरू होता, त्यानंतर तिथे स्मारक करण्याचा ठराव पुणे महापालिकेनेदेखील केला. परंतु, स्थानिक दुकानदारांनी न्यायालयात धाव घेतली. यात १३ वर्षे गेली. मीदेखील प्रकरण मिटविण्यासाठी प्रयत्न केले. दुकानदारांसाठी काही करता येईल
का, यासाठी प्रयत्न झाले. सरकारच्या वतीने व पुणे महापालिकेच्या वतीने आम्ही न्यायालयात लढलो. न्यायालयाने दिलेली मुदत संपल्यानंतर भिडे वाडा ताब्यात घेऊन पाडण्यात आला. आता चांगला आराखडा तयार करून मुलींची उत्तम शाळा निर्माण करू.

अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत
“लोकसभा निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका मांडली आहे. आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, असे भाजपला वाटते. अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, अशी आमची इच्छा आहे. एकनाथ शिंदे तर आता मुख्यमंत्री आहेतच. त्यांच्या लोकांना शिंदे मुख्यमंत्रिपदी कायम राहिले पाहिजेत, असे वाटते. कार्यकत्र्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी मुख्यमंत्रिपदाबाबत वक्तव्ये करण्यात येत आहेत,” असेही भुजबळ म्हणाले.