महाराष्ट्रातील पराभवाला मी जबाबदार, राज्य सरकारमधून मोकळे करा – देवेंद्र फडणवीस यांची पक्ष नेतृत्वाकडे मागणी
मुंबई, ५ जून २०२४: महाराष्ट्रातील अपयशानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपुमख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावं, अशी विनंती केंद्रीय नेतृत्वाला केली आहे. लोकसभेच्या पराभव नंतर आगामी विधानसभेसाठी मला पक्षात अंतर्गत काम करायचं आहे. त्यासाठी मी पक्षश्रेष्टीकडे मागणी करणार आहे, त्यांची भेट घेणार आहे. विधानसभेच्या दृष्टीने फक्त काम करण्यासाठी मला सरकार मधून मोकळा करा अशी ही मागणी मी पक्षश्रेष्ठींकडे करणार आहे. असं फडणवीस म्हणाले आहेत.
दोन महिन्यांपूर्वी मोठ्या उत्साहात बिगूल वाजलेल्या लोकसभा निवडणुकांची सांगता अखेर अंतिम निकालाने पूर्ण झाली. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून भाजपकडून आम्ही महायुती म्हणून 45 च्या पुढे जागा जिंकू असा नारा दिला होता. तसंच, भाजपकडून दोन पक्ष फोडण्यात आले. एक शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस. परंतु, सामान्य मतदारांनी हे सगळ नाकारलं हेच या निवडणुकीत समोर आलं आहे. कारण भाजपला दोन आकडी संख्याही गाठता आली नाही इतका दारून पराभव झाला आहे. या अपयशानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पराभवाची जबाबदारी घेतली आहे.
राज्यात भाजपने २८ लोकसभेच्या जागा लढवून त्यापैकी केवळ ९ जागांवर विजय मिळवला आहे. भाजपची जोरदार पिछेहाट झाली असून, २०१९ च्या तुलनेत १४ जागा कमी झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर भारतीय जनता पक्षाची आज बैठक झाली. या बैठकीत पराभवासंदर्भात विचारमंथन करण्यात आले. त्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी भाजपचा पराभव का झाला? त्याचे कारणे माध्यमांना सांगितली. मराठा आरक्षण, शेतीमालास भाव हे प्रश्न कळीचे मुद्दे ठरले. तसेच संविधान बदलणार असल्याचा जो प्रचार केला गेला, त्याचा फटका भाजपला बसला असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आता लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राज्य मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच पराभवाची जबाबदारी स्वीकारत राज्य मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. नेता म्हणून महाराष्ट्रातील भाजपच्या पराभवाची सर्व जबाबदारी माझी आहे. पण मी हरणारा नाही, पण ताकदीने मैदानात उतरणार आहे. परंतु नेतृत्वाला माझी विनंती आहे, मला मुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे आणि पक्षात काम करण्याची जबाबदारी द्यावी, असे धक्कादायक विधान देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना केले.