गुलाबराव पाटील – खडसेंमध्ये खडाजंगी, जळगाव जिल्हा नियोजन समितीत कथित गैरव्यवहाराचा आरोप

मुंबई, ९ मार्च २०२३ : राजकारणातले कट्टर प्रतिस्पर्धी आमदार एकनाथ खडसे आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात बुधवारी विधान परिषदेत शाब्दिक खडाजंगी झाली. वैद्यकीय वस्तू खरेदी विधेयकावर बोलताना खडसे यांनी कोरोनाकाळात जिल्ह्याच्या नियोजन समितीमधील निधीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला. यावरून गुलाबराव पाटील यांचा पारा चढला आणि खडसे यांच्यावर असलेल्या आरोपावरून लक्ष्य केले.
जळगाव गुलाबराव पाटील एकनाथ खडसे महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाबाबतच्या विधेयकावर बोलताना खडसे यांनी कोरोना काळात जळगाव ‘डीपीडीसी’च्या माध्यमातून झालेल्या खरेदीत चाळीस कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे, असा आरोप शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांनी केला असल्याची माहिती दिली. तसेच जळगाव जिह्यातील इतर गैरव्यवहारावरही बोट ठेवले. त्यामुळे संतापलेल्या गुलाबराव पाटील यांनी ‘ज्यांचे कुटुंब तुरुंगात गेले, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्यांनी गैरव्यवहारावर बोलू नये,’ असा टोला खडसे यांना लगावला. यावर खडसे यांनीही उलटवार केल्यामुळे गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांची खडसेंसोबत शाब्दिक चकमक झाली.

जळगावसाठी वेगळे अधिवेशन ?

खडसे गुलाबराव पाटील वाद
वाढत असल्याचे ओळखून विधिमंडळ कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाहत विधान परिषदेच्या उपसभापतीडॉ. नीलम गोऱ्हे यांनी “जळगाव जिल्ह्यातील विषय निघाल्यावर त्यामुळे जळगावसाठी वेगळे अधिवेशन सभागृहात असे वारंवार घडत आहे. घ्यावे लागेल की काय असा प्रश्न मला पडला आहे,” असा टोला लगावला. त्यावर पाटील यांनी एकमेकांची उणीदुणी काढू नयेत, असे निर्देश दिले.