महाविकास आघाडी सरकारला राज्यपालांचा दणका; 12 आमदारांचे नामांकन रद्द

मुंबई, ५ सप्टेंबर २०२२: महाराष्ट्राच्या शिंदे सरकारने मागील महाविकास आघाडी सरकारने 2020 मध्ये पाठवलेल्या 12 विधान परिषदेच्या आमदारांसाठी नामांकनांची यादी मागे घेण्यास राज्यपालांनी त्यास मान्यता दिली आहे. शिंदे सरकार आता नव्या नावांची यादी राजभवनाला पाठवणार आहे.

गेले दोन वर्ष राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ही यादी थांबवून ठेवली होती, अखेर ती यादी रद्द केली.

 

मविआ सरकारच्या यादीत होती या नेत्यांची नावे

 

उद्धव ठाकरे यांनी राजभवनाला पाठवलेल्या यादीत शिवसेनेच्या कोट्यातून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, विजय करंजकर, नितीन बानुगडे पाटील आणि चंद्रकांत रघुवंशी, राष्ट्रवादीच्या कोट्यातून एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि गायक आनंद शिंदे आणि काँग्रेसच्या कोट्यातून रजनी पाटील, सचिन सावंत, अनिरुद्ध वाणकर, मुजफ्फर हुसेन यांच्या नावाचा समावेश होता.

 

भाजप आणि शिंदे गटात विधानपरिषदेचे जागावाटप

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता एमएलसीच्या जागा शिंदे गट आणि भाजपमध्ये विभागल्या जाणार आहेत. भाजपला एमएलसीच्या नऊ तर शिंदे गटाला तीन जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, शिंदे गटाकडून चार जागांवर दावा सांगितला जात असल्याचेही सांगण्यात येत आहे.