रामोशी समाजाच्या मागण्यांसाठी सरकार दरबारी वकील करेल- चंद्रशेखर बावनकुळे
पुणे, ०४/०२/२०२३: रामोशी समाजाच्या मागण्या या समाज हिताच्या असून आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांचे व्यक्तिमत्व जगासमोर प्रभावी पणे यावे यासाठी आहे.जो पर्यंत रामोशी समाजाच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत समाजाचे सरकार दरबारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमु्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे करेल असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी केले.
जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य आयोजित आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची 191 पुण्यतिथी मान वंदना सभेचे आज पुण्यातील बालगंधर्व रंगमंच येथे आयोजन करण्यात आला होते. यावेळी बावनकुळे बोलत होते. कार्यक्रमाचे मुख्य आयोजक, जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलतनाना उमाजी शितोळे, आमदार गोपीचंद पडळकर, राहूल कूल, माजी महपौर मुरलीधर मोहळ, मनसेचे वसंत मोरे, विक्रांत पाटील, पणाळे ताई, आदी मान्यरांसह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, जय मल्हार क्रांती संघटनेचे सदस्य आणि क्रांतीवीर उमाजी नाईक यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून आलेले हजारो संख्येने समाज बंधू भगिनीं उपस्थित होते.
आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, राजे उमाजी नाईक यांचे कार्य अत्यंत प्रेरणादारी आहे. गोरगरीब जनतेच्या रक्षणासाठी जुलमी ब्रिटिशांच्या विरोधात उमाजी नाईक उभे राहिले २७ ब्रिटिशांची मुंडके त्यांना परत भेट म्हणून पाठवली. ती वेळ तशी होती म्हणून उमाजी नाईक यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध संघर्ष केला. आजच्या परिस्थिती नुसार समाज बांधवांनी संघटित होऊन प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात लढले पाहिजे, बोलले पाहिजे, आपल्या हक्काबाबत संघटित झाले पाहिजे हिच उमाजी नाईकांना श्रद्धांजली ठरेल.