ईश्वर चिठ्ठी राम शिंदेंना पावली ! जामखेडमध्ये भाजपचा सभापती, राष्ट्रवादीचा उपसभापती

जामखेड, १७ मे २०२३: जामखेड विधानसभा मतदारसंघातील एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे माजी मंत्री राम शिंदे ओळखले जातात. जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राम शिंदे आणि रोहित पवार यांच्या पॅनलला समसमान ९ जागा मिळाल्या. पण सभापती व उसभापती निवडीकडे दोन्ही पुन्हा सारख मते पडली, पण यामध्ये चिठ्ठी काढण्यात आली. यामध्ये राम शिंदे गटाला दिसाला मिळाला असून, भाजपचे शरद कार्ले हे सभापतीपदी झाले तर उपसभापतीपद हे आमदार रोहित पवार यांच्या गटाचे कैलास वराट हे उपसभापती झाले.

कर्जत-जामखेड बाजार समितीची निवडणूक झाली होती. दोन्ही बाजार समितीसाठी आमदार राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्या गटात जोरदार चुरस होती. त्यात राम शिंदे यांनी दोन्ही ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीचे पदाधिकारी फोडले होते. शिंदे यांनी निवडणुकीत रोहित पवारांना मोठे धक्के दिले होते. दोन्ही ठिकाणी मतदारांनी दोन्ही गटाला स्पष्ट बहुमत दिले नाही. दोन्ही बाजार समित्यांमध्ये दोन्ही गटाला समसमान नऊ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे सभापती व उसभापती निवडीसाठी चुरस निर्माण झाली होती.

संचालक फुटू नये म्हणून दोन्ही गटाकडून विशेष काळजी घेण्यात आली होती. दोन्ही गटाने आपले संचालक हे सहलीला पाठविले होते. दोन्ही गटाचे संचालक आज जामखेडमध्ये दाखल झाले. सभापतीपदासाठी शिंदे गटाकडून शरद कार्ले, तर रोहित पवार गटाकडून सुधीर राळेभात यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर उपसभापतीपदासाठी शिंदे गटाकडून सचिन भुमरे, तर पवार गटाकडून कैलास वराट यांनी उमेदवारी दाखल केली. मतदान झाल्यानंतर सभापती, उपसभापतीपदाचा उमेदवाराला समसमान नऊ मते मिळाली.

त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दोन्ही पदाधिकारी निवडण्यासाठी ईश्वर चिठ्ठीची मदत घेतली. त्यात सभापतीची ईश्वर चिठ्ठी ही शरद कार्ले यांच्या नावाची निघाली आहे. तर उपसभापतीची चिठ्ठी ही कैलास वराट यांच्या नावाची निघाली आहे. जामखेड बाजार समितीमध्ये भाजप-राष्ट्रवादीमध्ये जोरदार चुरस होती. ही चुरस सभापती, उपसभापती निवडीमध्ये दिसून आली. भाजपचा सभापती, तर उपसभापती राष्ट्रवादीचा झाला आहे.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप