शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला; राजकारण पेटले
सिंधुदुर्ग, २६ आॅगस्ट २०२४ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचं समोर आलंय. मागील वर्षी नौदल दिनानिमित्त सिंधुदूर्गमधल्या मालवणमध्ये शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. मोदींच्या हस्ते ४ डिसेंबर २०२३ ला या पुतळ्याचं अनावरण झालं होतं. भाजपाच्या भ्रष्ट कारभाराने छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महाराष्ट्राचा अपमान केला आहे.
४ डिसेंबर २०२३ रोजी नौदल दिनानिमित्त मोठा गाजावाजा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेला छत्रपती पुतळा आज कोसळल्याने विरोधकांकडून टीकेची झोड उठवण्यात येत आहे. शिवरायांचा पुतळा निकृष्ट दर्जाच्या कामामुळे कोसळला आहे. सहा महिन्यांपूर्वीच पुतळा उभारण्यात आला. पुतळ्याचं काम सुरु असताना स्थानिक लोकांकडून पुतळ्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामासंदर्भात अनेकदा तक्रारी करण्यात आल्या पण या तक्रारींकडे दुर्लक्ष केलं असल्याचा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केलायं.
नौदलाच्या गणवेशावर छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा असणार अशी घोषणा नरेंद्र मोदी यांनी नौदल दिनानिमित्त केली होती. याचं दिवशी त्यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं.
शिवरायांचा अन् महाराष्ट्राचा अपमान :
भाजपाच्या भ्रष्ट कारभाराने छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महाराष्ट्राचा अपमान केला आहे. ४ डिसेंबर २०२३ रोजी नौदल दिनानिमित्त मोठा गाजावाजा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज दुपारी कोसळला. निकृष्ठ बांधकामामुळे हा पुतळा कोसळल्याचा आरोप स्थानिकांनी केला असल्याचं सांगत महाराष्ट्र काँग्रेसकडून पोस्ट शेअर करण्यात आलीयं.
आज श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवार; श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण आजच आल्याने देशात सर्वत्र उत्साह
दरम्यान, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना देशातील पहिल्या आरमाराचे जनक म्हणून ओळखले जातात. भारतीय नौदलाने देखील आपल्या ध्वजावर शिवरायांची राजमुद्रा छापली आहे. या पार्श्वभूमीवर नौदलाच्यावतीने 4 डिसेंबर 2023 चा नौदल दिन छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ले सिंधुदुर्गच्या साक्षीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण झालं. मात्र आता हा पुतळा कोसळ्याने विरोधकांकडून टीका केली जात आहे.