राहुल गाधींवर चालवा देशद्रोहाचा खटला – आमदार नीतेश राणे यांची टीका

मुंबई, १२ मार्च २०२३ : ‘राहुल गांधी यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवायला हवा. ते बाहेर देशांत भारताची बदनामी करून टाळ्या नीतेश राणे मिळवत आहेत. हे देशद्रोह्यासारखे आहे. जेवढा द्वेष पाकिस्तान करतो, तेवढाच राहुल करत आहेत. पाकिस्तान आणि राहुल यांची भाषा एकच असून, त्यांना देशाबाबत बोलण्याचा अधिकार नाही,’ अशी टीका भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी शनिवारी केली. ‘भारत जोडो’ यात्रेनंतर राहुल गांधी ब्रिटनच्या दौऱ्यावर होते. त्या वेळी त्यांनी हार्वर्ड आणि केम्ब्रिज विद्यापीठात बोलताना भाजपवर जोरदार हल्ला केला. संसदेत नोटबंदी, जीएसटी, चीनबाबत बोलण्याची परवानगी दिली

जात नाही, असा आरोप त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर नीतेश यांनी राहुल यांची दहशतवाद्यांशी तुलना केली. ‘राहुल गांधी ज्या घरात राहतात, सुविधा वापरतात, ते भारत सरकारचे आहे. त्याच भारताची तुम्ही बदनामी करत असाल, तर दाऊद इब्राहिम, ओसामा बिन लादेन आणि राहुल यांमध्ये काही फरक नाही. पाकिस्तान आणि राहुल एकच आहेत,’ असे ते म्हणाले.

‘बडबड थांबवा – लोंढेंचा इशारा
‘काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची तुलना दहशतवादी लादेन आणि कुख्यात गुंड दाऊदशी करून भाजप आमदार नीतेश राणे यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. राहुल यांच्यावर बोलण्याएवढी त्यांची राजकीय उंची आणि पात्रता नाही. त्यामुळे त्यांनी वाह्यात बडबड थांबवावी; अन्यथा त्यांचे वस्त्रहरण त्यांच्याच भाषेत करू,’ असा इशारा प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी प्रत्युत्तर देताना दिला.