फडणवीस यांची ठाकरे सरकारवर टीका – ‘ठाकरेंच्या काळात गुंतवणूक घटली होती’
पुणे, ता. १८ ऑक्टोबर २०२३: मी २०१४ ते २०१९ या पाच वर्षात मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र गुंतवणुकीमध्ये पहिल्या क्रमांकावर होता. मधले दोन वर्ष आपली सत्ता नसताना इतर राज्यात गुंतवणूक वाढली. आता तुमच्या आशीर्वादाने पुन्हा सत्ता आल्यानंतर यावर्षी महाराष्ट्र गुंतवणुकीमध्ये पुन्हा क्रमांक एकवर गेला आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली.
जनता सहकारी बँकेच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या शुभारंभ सोहळ्यात देवेंद्र फडणवीस बोलत होते. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री देवेंद्र फडणवीस, श्री समर्थ रामदास स्वामी संस्थान सज्जनगडचे अध्यक्ष भूषण स्वामी महाराज, बँकेचे अध्यक्ष रवींद्र हेजीब, उपाध्यक्ष ॲड. अलका पेटकर, जगदीश कश्यप आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी बँकेच्या बोधचिन्हाचे अनावरण आणि गरुडझेप या बँकेच्या गृहपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आर्थिक जगतात अनेक राष्ट्रीयकृत बँका, व्यावसायिक बँका येऊन देखील सहकारी बँका आपली फसवणूक करणार नाहीत, आपुलकीने वागवतात त्यामुळे त्यांच्यावरील सामान्य जनतेचा विश्वास कायम आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीत या बँकांचा मोठा वाटा आहे. पण एखाद्या बँकेचा घोटाळा समोर आल्यानंतर त्याचा परिणाम सचोटीने काम करणाऱ्या बँकेवरही होतो. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी प्रामाणिकपणे काम करावे.
‘‘समाजाला आर्थिक गरज असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी सहकारी बँका सुरु करून त्या यशस्वीपणे चालविल्या. जनता सहकारी बँकेने अन्य बँकांचे बँकांचे विलीनीकरण करून घेऊन ग्राहक हिताचे संरक्षण करत हित व विश्वास जपला. आर्थिक व सामाजिक प्रगती शिवाय देश पुढे जाणार नाही, त्यासाठी भक्कम वित्तीय पुरवठा आवश्यक आहे. ज्यांची विश्वासहर्ता आहे अशांना वित्त पुरवठा कमी पडत नाही. कोरोना काळातील चीनच्या चुकीच्या वर्तनामुळे तेथील उद्योग भारतात उद्योग येत आहेत. पुण्यामध्येही गुंतवणुकीसाठी चौकशी करण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा वेळी अद्ययावत तंत्रज्ञान असलेल्या वित्तीय संस्थांचे जाळे महत्त्वपूर्ण ठरते. बदलत्या काळानुसार सहकारी बँकेने डिजिटल मार्केटींगमध्येही पाऊल ठेवले पाहिजे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘राष्ट्रीयकृत बँकेत उभे ही करत नसताना सहकारी बँकांच्या मदतीमुळे सामान्य जनतेला जगतो. त्यांच्या मदतीमुळेच तो व्यवसाय करण्याचे धाडस करतो. आमच्या सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण महाविकास आघाडी सरकारच्या काळात गेले. हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले पाहिजे यासाठी देवेंद्र फडणवीस दिवसरात्र काम करत आहेत. शासकीय नोकर भरतीवर मर्यादा आहे, त्यामुळे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामुळे अनेक तरुणांना आर्थिक मदत केली जात आहे, त्यामुळे ते व्यवसाय सुरु करून रोजगार निर्माण करत आहेत. लहान माणसांना मोठ करण हे आपले लक्ष्य असले पाहिजे.