एक्झिट पोलचे कल महायुतीच्या बाजुने,२३ नोव्हेंबर रोजी निकाल

मुंबई, २० नोव्हेंबर २०२४: गेले महिनाभर मोठ्या उत्साहात प्रचाराने गाजलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान आज बुधवार (दि. २१ नोव्हेंबर)रोजी होत असून, त्यात ४ हजार १३६ उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. ९ कोटी ७० लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्याचबरोबर मुंबई, ठाणे आणि पुण्यात मतदानाची टक्केवारी वाढवण्याचं आव्हानही निवडणूक आयोगासमोर आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीत चुरस आहे. या सर्व घडामोडींवर लेट्सअप मराठीची नजर असून आपल्याला या पेजवर सर्व अपडेट्स मिळणार आहेत. महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघात काय घडत आहे किंवा कुठ किती मतदान होतय या सर्व घडामोडींसाठी कायम लेट्सअप मराठीशी जोडलेले राहा.

एक्झिट पोलनुसार महायुतीला पुन्हा सत्ता
इलेक्ट्रोल एज : महायुती – १२१, मविआ- १५०, अपक्ष – २०

पोल डायरी : १२२-१७६, मविआ – ६९-१२१ , इतर १२-१९

मॅट्रिझ : महायुती १५०-१७०, मविआ -११०-१३०, अन्य ८-१०

पीपल्स पल्स : महायुती १७५-१९५, मविआ-८५-१२, अपक्ष-७-१२