पैसे वाटपाचा ड्रामा – रवींद्र धंगेंकरांसह शंभर जणांवर गुन्हा दाखल

पुणे, १४ मे २०२४ : पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान होत असताना त्याच्या आदल्या रात्री (१२ मे २०२४) काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह सहकार नगर पोलीस ठाण्यामध्ये आंदोलन केले. भाजप झोपडपट्टीमध्ये पैसे वाटत असल्याचा आरोप करून त्यांनी वातावरण ढवळून काढले. यामुळे पोलीस ठाण्याच्या बाहेर जमावबंदीचा आदेश झुगारून शेकडो कार्यकर्ते उपस्थित राहिले शांतता भंग केली. यामुळे रवींद्र धंगेकर नितीन कदम यांच्यासह १०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पुणे लोकसभेच्या निवडणुकीत प्रचाराचे सांगता शांततेत झाली मात्र मतदान होण्यापूर्वी धंगेकर यांनी आंदोलनाचा ड्रामा करून वातावरण गंभीर केले होते पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी मतदारी आंदोलन मागे घेतले. पोलिसांनी पैसे वाटप करणाऱ्यांवर कारवाई केलेली नसली तरी आंदोलन करताना मात्र गुन्हे दाखल केलेले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र धंगेकर हे त्यांच्यासोबत १०० ते १०५ त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते असे मिळून सहकार नगर पोलीस स्टेशन येथे आले. त्यांनी पोलिसांना भाजप पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते विविध ठिकाणी पैसे वाटप करत आहेत असे सांगितले. पोलिसांनी त्यांना आम्ही तुम्ही सांगितलेल्या माहितीची खात्री व शहानिशा करू. तसा प्रकार मिळून आल्यास आम्ही त्यांच्यावर योग्य ते कारवाई करू. आपली काय असेल ती तक्रार द्या असे वारंवार धंगेकर यांना सांगितले. त्यांनी त्याबाबत काही ऐकून न घेता बेकायदेशीरपणे पोलीस ठाणे येथे जमाव जमवून घोषणाबाजी सुरू केली. पोलिसांनी वारंवार सांगूनही तेथून निघून न जाता त्या ठिकाणी हजर राहून उपस्थित कार्यकर्त्यांना आपल्या पक्षाची कामे तसेच दुसऱ्या पक्षाविषयी मोठमोठ्याने घोषणा देऊन सहकारनगर पोलीस स्टेशन येथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल तसेच आचारसंहितेचा भंग केला. त्यामुळे रवींद्र दंगेकर व त्यांच्यासोबतच्या लोकांवरती सहकारनगर पोलीस ठाणे येथे भादवि 143, 145, 149, 188, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135, लोकप्रतिनिधी अधिनियम चे कलम 126 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.