डाॅ. हाजी शेख, आफताब शेख यांची समन्वयक पदी नियुक्ती

पुणे, १८ फेब्रुवारी २०२३ : चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस तर्फे दोन पदाधिकाऱ्यांची समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. यामध्ये डॉ. हाजी शेख आणि आफताब शेख यांचा समावेश आहे.

चिंचवड मतदार संघाची पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे हे लढवत आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादीसह काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांची युती आहे. प्रचारामध्ये सर्व पक्ष एकत्र असावेत त्यांच्यामध्ये समन्वय असावा यासाठी तिन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना विविध प्रकारची जबाबदारी दिली जात आहे. त्यानुसार समन्वयक पदाची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हाजी शेख आणि आफताब शेख यांची नियुक्ती केल्याचे पत्र काढले असून याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही दिली आहे.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप